संजना-अरुंधती, सौंदर्या, गौरी आणि शालिनी यांच्या हटके लूकची चर्चा | पुढारी

संजना-अरुंधती, सौंदर्या, गौरी आणि शालिनी यांच्या हटके लूकची चर्चा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : संजना-अरुंधती, सौंदर्या, गौरी आणि शालिनीच्या हटके लूकची सध्या चर्चा होतेय. संजना-अरुंधती यांची सध्या चर्चा होताना दिसतेय. स्टार प्रवाहवर १२ सप्टेंबरला दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात या अभिनेत्री वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत.

‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या गणपती विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार आहे, यात शंका नाही. या विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील संजनाला आपण आतापर्यंत मॉडर्न अंदाजात पाहात आलोय. मात्र गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संजनाचा नऊवारी साडीत दिसणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि शालिनीही वेगळ्या रुपात दिसतील. आधुनिकतेची जोड देत त्यांनी सर्वांचेचं लक्ष वेधून घेतलं आहे.  आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती आणि रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार यांचं साडीमध्ये सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

मनोरंजनाचा डबल धमाका

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत आनंदात होणार आहे. अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं जल्लोषात पार पडणार आहे.

सणासुदीचे दिवस म्हटले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखील खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा हा गणपती विशेष कार्यक्रम असेल.

स्टार प्रवाह परिवाराचा हा गणपती आहे. त्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

तेव्हा पाहायला विसरु नका. १२ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह परिवार गणशोत्सव २०२१.

हेही वाचलं का ? 

Back to top button