सनी चित्रपटात ललित प्रभाकर याची एन्ट्री

सनी चित्रपटात ललित प्रभाकर याची एन्ट्री
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वीच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ॲपचे 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षितच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ॲपला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. त्यावरील वेबसीरीज सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन वेबसिरीज व सिनेमे आणणार आहेत. त्यापैकीच एक सनी चित्रपट होय. या चित्रपटात ललित प्रभाकर याची एन्ट्री झाली आहे. यामध्ये ललित प्रभाकर 'सनी'ची भूमिका साकारत आहे.

अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी प्रस्तुत, 'चलचित्र कंपनी' निर्मित चित्रपटाचे टिझर पोस्टर रिलीज झाले होते. हेमंत ढोमे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

पोस्टरवर आपल्याला निळ्याशार आभाळाखाली 'सनी' खळखळून हसताना दिसतोय. लाल, पिवळा, निळा असे गडद रंग आणि ललितचे खळखळून हसणे.

या पोस्टरवरूनच कळतेय की, हा सिनेमा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोण देणारा आहे.

या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. २०२२ मध्ये 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात…

"हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. यातील 'सनी'चे आयुष्य काही प्रमाणात मी स्वतःही जगलो आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे.

ललित या भूमिकेला तो योग्य न्याय देऊन त्यात रंग भरेल याची खात्री आहे.

अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत प्रथमच काम करत आहे. मी खूप उत्सुकही आहे आणि त्याचा आनंदही आहे."

अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " हेमंत ढोमे उत्तम नट आहेच. त्याचबरोबर तो दिग्दर्शक म्हणूनही उत्तम आहे. ललित प्रभाकरने आपण उत्कृष्ट अभिनेता असल्याचे अनेक सिनेमांमधून सिद्ध केले आहे.

'प्लॅनेट मराठी' सोबत अनेक कलाकार आणि दिग्दर्शक जोडले गेले आहेत.

आमच्या या परिवारात आता हेमंत ढोमे आणि ललित प्रभाकर यांचाही समावेश होतोय याचा आनंद आहे.

या दोघांबरोबर एकत्र काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे".

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news