KJo : करण जोहरने ट्विटरला केले 'गुड बाय!' | पुढारी

KJo : करण जोहरने ट्विटरला केले 'गुड बाय!'

पुढारी ऑनलाइन डेस्क : KJo बॉलिवूड सेलिब्रिटी करण जोहर याने एक पोस्ट करून ट्विटरला रामराम ठोकला आहे. त्याच्या या ट्विट नंतर करण जोहरची ती पोस्ट मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. तसेच हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. करणच्या ब्रेक घेण्यासाठीच्या करणच्या ट्विटला त्याच्या लाखो चाहत्यांनी आणि फोलोवर्सने लाइक, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पाडला आहे.

KJo बॉलिवूडचा मोस्ट सक्सेसफुल निर्माता, दिग्दर्शक आणि कॉफी विथ करणचा होस्ट याने सोमवारी घोषित केले की त्यांनी ट्विटिंग अॅपमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:00 वाजता त्यांनी शेअर केली.

करणने म्हटले आहे, मला अधिकाधिक स्पेस बनवायची आहे. त्यामुळे मी एक ब्रेक घेत आहे, Good Bye ट्विटर!

KJo त्याच्या पोस्टला अनेक उत्तरे मिळाली. काही जण आनंदी होते तर काहींनी करणची उडवली आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, “@pikaso_me हा स्क्रीनशॉट.” आणखी एकाने विनोदाने प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज दोघांना श्रद्धांजली वाहणार आहोत. #karanjohar ट्विटर अकाऊंट आणि #मुलायम सिंह यादव. (समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक ज्यांनी १० ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या संदर्भात) #RestInPeace. दुसर्‍याने मनापासून प्रतिसाद लिहिला. “तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा आणि ‘ब्रह्मास्त्र: भाग २’ शुभेच्छा. सकारात्मकता पाठवत आहे. ”

जोहर अजूनही इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. त्याचे तेथे सुमारे 13.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर त्याला 17.2 दशलक्ष चाहते फॉलो करतात.

हे ही वाचा:

मनोरंजन : रिमझिम गिरे सावन

Katrina Kaif On Koffee With Karan : करण जोहरने कॅटरिनाला विचारले हनीमुनच्या ‘रात्री’ विषयी; ती म्हणाली, ‘त्या’साठी ‘रात्र’च कशाला हवी

Back to top button