Katrina Kaif On Koffee With Karan : करण जोहरने कॅटरिनाला विचारले हनीमुनच्या ‘रात्री’ विषयी; ती म्हणाली, ‘त्या’साठी ‘रात्र’च कशाला हवी | पुढारी

Katrina Kaif On Koffee With Karan : करण जोहरने कॅटरिनाला विचारले हनीमुनच्या ‘रात्री’ विषयी; ती म्हणाली, ‘त्या’साठी ‘रात्र’च कशाला हवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : करण जोहरचा कॉफी विथ करण ‘शो’ (Katrina Kaif On Koffee With Karan) सध्या खूप चर्चेत आहे. या सीझनमध्ये अनेक प्रसिद्ध स्टार्स या शोमध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल आणि लव्ह लाईफबद्दल खुलासा करताना दिसले आहेत. अशा परिस्थितीत, कॉफी विथ करणच्या दहाव्या पर्वात, सुपरस्टार कॅटरिना कैफ तिचे सहकलाकार ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसह करणच्या ‘शो’ मध्ये पोहोचले आणि जिथे ते खूप मस्ती करताना दिसले. सीझनच्या या पहिल्या त्रिकूटाने ब्रोमन्स, लव्ह इंटरेस्ट आणि हनिमून यांसारख्या संकल्पनांवर खुलेपणाने चर्चा केली. कॉफी विथ करणचा एक प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, ज्यामध्ये कॅटरिना हनीमूनवर बोलताना दिसत आहे.

बॉलीवूडमधी खचाखच भरलेल्या आणि आलिशान झगमगाटांचे लग्नसोहळ्ये होत असतात मग कॉफी विथ करणच्या (Katrina Kaif On Koffee With Karan) सोफ्यावर हनिमूनची चर्चा होऊ नये असे कसे होईल. अलीकडे, आलिया भट्टने हनिमूनची संकल्पना मिथक म्हणून खोडून काढली असताना, कॅटरिना कैफने लग्नानंतर कंटाळलेल्या जोडप्यांना एक चांगला उपाय सांगितला. कॅटरिना म्हणाली, “नेहमीच ‘मधूचंद्र’ अर्थात ‘सुहागरात’ असावी असे काही आवश्यक नाही. तर तो ‘मधूसूर्य’ अर्थात ‘सुहागदिन’ देखील असू शकतो.” अशा स्थितीत हनिमूनच्या प्रचारामुळे संघर्ष करणाऱ्या जोडप्यांसाठी कॅटरिना कैफचा युक्तिवाद तर्काने भरलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कॅटरिना कैफचा (Katrina Kaif On Koffee With Karan) हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती हनीमूनची संकल्पना ओव्हररेटेड म्हणून सांगत आहे. व्हिडिओमध्ये कॅटरिना “सुहागरात ही क्यूं. ये सुहाग दिन भी तो सक्ता है” असे म्हणताना दिसत आहे. अर्थात कॅटरिनाच्या म्हणण्यानुसार ती रात्र असावी असे काही नाही तर तो दिवस देखील असू शकतो. कतरिनाने सांगितले की, लग्नानंतर हे जोडपे इतके थकतात की हनिमूनसारखी संकल्पना एक मिथक वाटतात. लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वी जेव्हा आलिया भट्ट कॉफी विथ करणवर आली होती, तेव्हा तिने हनीमूनला एक मिथक असे संबोधले होते.

Back to top button