Kajal Agrwal : काजलचा ब्रेस्टफीडिंग जर्नीवर मोठा खुलासा, प्रसुतीची वेळ कठीण... | पुढारी

Kajal Agrwal : काजलचा ब्रेस्टफीडिंग जर्नीवर मोठा खुलासा, प्रसुतीची वेळ कठीण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrwal ) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. १९ मे, २०२२ रोजी, काजल आणि तिचा पती गौतम किचलू यांनी मुलगा नीलचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. काजल आणि गौतम यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. यानंतर, या तिने २०२२ मध्ये प्रेगेन्सीची घोषणा केली. काजलने १९ एप्रिल, २०२२ रोजी तिच्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने नील किचलू ठेवले. प्रसूती झाल्यापासून काजल चित्रपटांपासून दूर आहे आणि तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. (Kajal Agrwal )

अलीकडेच काजलने ‘फ्रीडम टू फीड’ मोहिमेअंतर्गत अभिनेत्री नेहा धुपियाशी संवाद साधला. यादरम्यान तिने आपल्या गरोदरपणाच्या प्रवासाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “माझ्या गरोदरपणात मी काम केले. माझ्याकडे बरेच प्रोजेक्ट्स होते जे मला पूर्ण करायचे होते. मी हे प्रोजेक्ट लवकर पूर्ण करण्याचा विचार करत होते. नीलचा जन्म होऊन ४० दिवस झाले होते. माझ्या आईने मला घर सोडू दिले नाही. घर, पण तरीही मी काम केले. माझे बाळ दुसर्‍या खोलीत होते आणि मी माझ्या आईच्या घरी शूटिंग करत होते आणि मी माझ्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्याचा मला आनंद आहे.”

काजलने तिच्या प्रसूतीबद्दलही सांगितले. तिचा अनुभव सांगताना ती म्हणाली, “माझ्या प्रसूतीच्या वेळी मी ध्यान करण्याचा प्रयत्न करत होते. मला सांगितलेल्या सर्व गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करत होते. जेव्हा माझ्या बाळाचा जन्म झाला, त्यावेळी त्याला पाहून मी रडले. जेव्हा तो समोर आला, तेव्हा त्या नऊ महिन्यांच्या गरोदरपणातील सर्व अडचणी आणि आव्हाने सर्व गायब झाली. माझ्यासाठी माझ्या बाळाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही. माझ्या आयुष्याचा आणि माझ्या बाळाचा विस्तार माझ्यासाठी खरोखरच सर्वात आनंदी गोष्ट आहे, तो माझ्या आयुष्यातील प्रेम आहे.”

 

यासोबतच काजलने तिच्या कामामुळे मुलाला घरी एकटे सोडल्याचेही सांगितले. ती म्हणाली, “माझ्यासाठी जिमला जाणेही खूप अवघड आहे. सुदैवाने, मला घरी मदत मिळते. सुरुवातीला मला बाळाला एकटे सोडणे सोयीचे नव्हते. मी नेहमी खूप काळजीत असे. मला ‘अरे देवा. कोणीतरी नील सोबत असायला हवे आणि तिथे कोणीही नाही, पण मी त्याच्यासोबत असायला हवे.’ असे वाटायचे. प्रत्येक वेळी मी सेटवर पाऊल ठेवते, मग ते चित्रपटासाठी असो किंवा जाहिरातीसाठी, अगदी एका दिवसाच्या शूटसाठीही, मला माझ्या मुलाला एकटे सोडायचे नाही. असे करताना मला खूप वाईट वाटते.”

या संभाषणादरम्यान काजल अग्रवालने तिच्या प्रसूतीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आणि सांगितले की स्तनपान करणे (ब्रेस्ट फिडींग) तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. याविषयी ती म्हणाली,”मी थेट स्तनपानासाठी जाण्यासाठी खूप उत्सुक होते, पण सुरुवातीला हे थोडे आव्हानात्मक होते, कारण माझ्या बाळाला खूप वेदना होत होत्या. त्यामुळे मला सुरुवातीला हे अवघड वाटले आणि यासाठी मी स्तनपान तज्ज्ञांशी बोलले. तसेच मी माझ्या डॉक्टरांशी बोलले.”

Back to top button