Akanksha Sharma : कोण आहे आकांक्षा शर्मा? टायगर तिच्या प्रेमात? | पुढारी

Akanksha Sharma : कोण आहे आकांक्षा शर्मा? टायगर तिच्या प्रेमात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉट आणि बोल्ड दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांची ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची निराशा झाली; पण दिशासोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान टायगरचे नाव आता एका नव्या अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे, तिचे नाव आहे आकांक्षा शर्मा. (Akanksha Sharma)टायगर आणि आकांक्षा एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. पण या बातम्या कुठून सुरू झाल्या आणि आकांक्षा कोण आहे? तुम्हाला माहितीये का? (Akanksha Sharma) tiger shroff and akanksha sharma

आकांक्षा-टायगर डेटिंगवर

वास्तविक, टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्मा यांनी म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. पहिल्या म्युझिक व्हिडिओचे नाव ‘कॅसानोव्हा’ आणि दुसऱ्याचे नाव ‘आय एम अ डिस्को डान्सर २.०’ अशी नावे आहेत. या दोन्ही गाण्यांमध्ये टायगरची आकांक्षासोबतची केमिस्ट्री जबरदस्त होती. असा दावा केला जात आहे की, या दोन गाण्यांच्या शूटिंगदरम्यान टायगर आणि आकांक्षा एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

कोण आहे आकांक्षा शर्मा?

आकांक्षा शर्मा व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तसेच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे. जिने २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिविक्रम’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली. आकांक्षाने तिच्या सुरुवातीच्या काळात साऊथ इंडस्ट्रीतील बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबू, कीर्ती आणि बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांच्अ‍यासहनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती बादशाहच्या हिट म्युझिक व्हिडिओ ‘जुगनू’मध्येही दिसली होती.
टायगरसाेबतच्‍या डेटिंगवर आकांक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तिच्या आणि टायगरच्या नात्याच्या वृत्तांवर तिने मौन बाळगले आहे.

हेदेखील वाचा-

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Sharma (@akanksharmaa)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Sharma (@akanksharmaa)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Sharma (@akanksharmaa)

Back to top button