Raju Srivastava Health : राजू श्रीवास्तव २५-३० तासांपासून बेशुद्धावस्थेत, मित्राने दिली माहिती | पुढारी

Raju Srivastava Health : राजू श्रीवास्तव २५-३० तासांपासून बेशुद्धावस्थेत, मित्राने दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : AIIMS च्या डॉक्टरांच्या निगरानीखाली कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचे चाहते हीच प्रार्थना करत आहेत की, तो लवकरात लवकर बरा व्हावा. (Raju Srivastava Health) फिटनेस फ्रीक असतानाही राजू श्रीवास्तवला हार्ट ॲटॅक आल्याने प्रत्येकाला धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येतेय. (Raju Srivastava Health)

१० ऑगस्टला राजू श्रीवास्तवला हार्ट ॲटॅक आला होता. त्यानंतर तत्काळ त्याला दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल करण्यात आले होते. २४ तासानंतरदेखील राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक आहे.

श्रीवास्तव यांच्या जवळचे मित्र अहसान कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांचा मेंदू सध्या म्हणावा तसा कार्यक्षम नाही. एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, ते म्हणाले की, मागील २५ ते ३० तासांपासून राजू श्रीवास्तव बेशुद्धावस्थेत आहे.

डॉक्टरांनी प्रतीक्षा करायला सांगितलं आहे. तो आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. काही तासांपूर्वी त्याने हालचाल केल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण, त्याचा मेंदू म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी राजूच्या पत्नीला येथे न येण्सास सांगितले आहे. दवाखान्यात गर्दी टाळण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. मी मुंबईत आहे. पण माझा मित्र दिल्लीत आहे. पण, त्यांच्या आरोग्याची अपडेट ठेवून संपर्कात आहे.

हेदेखील वाचा-

Back to top button