

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांचा क्लॅश पाहायला मिळत आहे. एक आहे आमिर खान, करीना कपूर स्टारर 'लाल सिंग चड्ढा' (laal singh chaddha ) आणि दुसरा अक्षय कुमार, भूमी पेडणेकर यांचा 'रक्षा बंधन'. हे चित्रपट चित्रपट गुरुवारी धूमधडाक्यात प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांबाबत सोशल मीडियावर बायकॉटचा ट्रेंड होता. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटगृहात किती कमाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता 'लाल सिंग चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'च्या सुरुवातीच्या कलेक्शनची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली. पण, त्यानंतर लाल सिंह चड्ढाचा प्रतिसाद थंडावला. एकूणच या दोन्ही चित्रपटांची कमाई पहिल्या दिवसाच्या अपेक्षेपेक्षा कमी ठरली. (laal singh chaddha )
आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. शो पाहिल्यानंतर चित्रपटगृहांमधून आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरही संमिश्र होत्या. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला. 'लाल सिंग चड्ढा'ने ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास १२ कोटी कमावले.
फायनल कलेक्शनमध्ये कमाईबाबतीत वाढ होऊ शकते. बॉक्स ऑफिस रेकॉर्डनुसार, 'लाल सिंग चड्ढा'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधन हा समावर आधारित होता. कथेत भावना, कुटुंब आहे. अक्षय कुमारचे चित्रपट कास दिनी रिलीज होतात, ते नेहमीच चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर नेहमीच प्रभावी ठरतात. पण यंदा आमिरच्या चित्रपटापेक्षाही अक्षयच्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 'रक्षा बंधन'चे ओपनिंग कलेक्शन बॉक्स ऑफिसवर जवळपास ९ कोटींपर्यंत पोहोचले आहे. हा आकडा २०२२ मध्ये अक्षयच्या 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' या दोन मोठ्या फ्लॉप चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनपेक्षा कमी आहे.
दोन्ही चित्रपटांसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गुरुवारी प्रदर्शित झाल्यामुळे त्यांना दीर्घ विकेंड मिळाला आहे आणि पुढील ३ दिवसांची कमाई त्यांच्या बॉक्स ऑफिसवरील आरोग्याचा निर्णय घेईल. आता चाहत्यांच्या नजरा 'लाल सिंग चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'च्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनवर असतील.
हेदेखील वाचा-