Brahmastra : ब्रह्मास्त्रमधील शाहरूखचा व्हिडिओ लीक

Brahmastra sahrukha
Brahmastra sahrukha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' ( Brahmastra) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील आलिया, रणबीर, बिग बी अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागा चैतन्य यांची झलक यापूर्वीच पाहायला मिळाली आहे. अयान मुखर्जीच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात आता आणखी एका मोठ्या स्टारचे नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान म्हणजे, अभिनेता शाहरुख खान दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील शाहरुखचा सध्या नवा लूकचा व्हिडिओ समोर आला आहे.

शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. याच दरम्यान आलिया आणि रणबीरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे. याआधी शाहरूखची चित्रपटातील एक झलक पाहायला मिळाली होती. परंतु, त्यात शाहरूखचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. सध्या मात्र, शेअर झालेल्या व्हिडिओत शाहरूखचा चेहरा ठळक दिसतोय. हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर व्हायरल झाला आहे. यात शाहरुखची भूमिका वरती हवेत उडताना आणि त्याच्या मागे भगवान हनुमानासारखी आकृती तयार झाल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात शाहरूख दिसणार म्हणून उत्सुक आहेत. तर दुसरीकडे हा व्हिडिओ त्याच चित्रपटातील आहे की नाही? याबाबत सांशकता आहे. याच दरम्यान शाहरूख यावर्षी मोठ्या पडद्यावर दोनदा दिसला असून दोन्ही वेळा त्याने कॅमिओचा रोल केला होता. आर माधवनच्या 'रॉकेट्री' (Rocketry The Nambi Effect) आणि आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' मध्ये कॅमिओच्या भुमिकेत तो दिसला आहे. याशिवाय शाहरुखकडे तीन मोठ्या चित्रपटांची ऑफर आहे. सिद्धार्थ आनंद याच्या 'पठाण', 'जवान' आणि राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news