Urvashi Rautela : ऋषभ पंत उर्वशीवर वैतागला-‘माझा पिच्छा सोड ताई’

ऋषभ पंत - उर्वशी रौतेला
ऋषभ पंत - उर्वशी रौतेला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय टीमचा विकेट कीपर ऋषभ पंत सध्या बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे चर्चेत आहे. उर्वशीच्या एका विधानानंतर हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बॉलिवूड अभिनेत्रीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत 'मिस्टर आरपी' वरून एक प्रसंग सांगितला होता. सोशल मीडियावर पंतची इन्स्टा स्टोरी सांगून एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. यामध्ये लिहिलं होतं-'मेरा पीछा छोड दो बहन, झूठ की भी हद होती है'. आता हा वाद पुढे नेत उर्वशी रौतेलाने ट्विट करून उत्तर दिले आहे.

आपल्या या ट्विटमध्ये उर्वशीने ऋषभ पंतला छोटू भैया म्हटलं. तसेच तिने पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लादेखील दिला. उर्वशीने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं- 'छोटू भैयाला बॅट बॉल खेळायला हवं. मी कुणी मुन्नी नाही, जी तुझ्यासाठी बदनाम होईन तुझ्यासाठी यंग किड्डो डार्लिंग. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. RP छोटू भैया. कुण्या शांत मुलीचा फायदा घेऊ नये. इतकचं नाही तर उर्वशीने स्वत:ला 'कूगर हंटर' म्हणून देखील संबोधित केलं आहे.'

खरंतरं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, यामद्ये उर्वशी एका मुलाखतीत 'मिस्टर RP (आरपी)' चा उल्लेख करते. आणि त्याच्यासोबत रिलेशीनशीप तुटल्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यानंतर सोशल मीडियावर दावा केला गेला होता की, मिस्टर RP हा दुसरा कुणी नाही तर पंतच आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news