पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 हजार अर्ज | पुढारी

पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 हजार अर्ज

पुणे : महापालिकेत 448 पदांसाठी मेगा नोकरभरती होणार आहे. यासाठी 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. शेवटच्या दिवसापर्यंत विविध पदांसाठी 87 हजार 471 अर्ज प्राप्त झाले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत तब्बल 52 हजार अर्ज आले आहेत. पालिकेला 5 लाख अर्ज येणे अपेक्षित होते, त्यामानाने अर्जाची संख्या कमी आहे.

महापालिकेत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ पदभरती झालेली नाही. महापालिकेत वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतच्या सुमारे 11 हजार जागा रिक्त आहेत. अपुर्‍या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय झाला आहे.

Back to top button