रणबीर-श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटला आग, तरुणाचा मृत्यू, शूटिंग पुढे ढकलले | पुढारी

रणबीर-श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटला आग, तरुणाचा मृत्यू, शूटिंग पुढे ढकलले

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी अनटायटल चित्रपटात शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली. चित्रपटाचा हा सेट मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आला होता. या आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे डॉक्टर सदाफुले यांनी दिली. एएनआयच्या वृत्तानुसार, अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट स्टुडिओमध्ये सायंकाळी साडेचार वाजता ही आग लागली. रणबीर आणि श्रद्धा लवकरच चित्रपटाचे शूटिंग करणार होते. पण लेव्हल-२ च्या आगीमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, २९ जुलै रोजी रात्री १०.३५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. स्टुडिओला लागलेल्या आगीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ आणि चित्रांमध्ये आकाशात भीषण आग आणि काळा धूर दिसत होता. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाजही ऐकू येत आहे.

याआधी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, परिसरातील एका दुकानात आग लागली होती. पण नंतर त्यांनी सांगितले की, आग एका चित्रपटाच्या सेटवर लागली, असे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले होते. घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. अधिकाऱ्याने सांगितले की आग तात्पुरत्या पंडालपर्यंत मर्यादित होती, जिथे काही लाकडी वस्तू आणि इतर वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.

(video : viralbhayani insta वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button