Prabhas-Anushka : 'बाहुबली'नंतर हे साऊथ स्टार पुन्हा एकत्र | पुढारी

Prabhas-Anushka : 'बाहुबली'नंतर हे साऊथ स्टार पुन्हा एकत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभास आणि अनुष्का शेट्टी (Prabhas-Anushka ) हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावे आहेत. या दोन्ही स्टार्सनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर या दोन कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या नात्याबाबत अनेकवेळा बातम्या आल्या आहेत. त्या दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही ही गोष्ट वेगळी. पण दरम्यान, आता एक ताजी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये प्रभास आणि अनुष्का पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रभास आणि अनुष्का शेट्टीने ‘बिल्ला’, ‘मिर्ची’ आणि ‘बाहुबली’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून ही जोडी चित्रपटाच्या पडद्यापासून दूर होती. प्रभास आगामी काळात काही चित्रपटांमध्ये काम करत आहे. पण, अनुष्का शेट्टी तिच्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड देत आहे, त्यामुळे तिला चित्रपटांमध्ये काम करता येत नाही.

मात्र, आता अनुष्का शेट्टीने दिग्दर्शक मारुतीला ग्रीन सिग्नल दिल्याच्या बातम्या येत आहेत. मारुती लवकरच एक चित्रपट बनवणार आहे. ज्यामध्ये तो प्रभाससोबत काम करताना दिसणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण एका सूत्रानुसार, निर्माते यावर्षी दसऱ्याला चित्रपटाची घोषणा करू शकतात. अशा परिस्थितीत ही बातमी समोर येताच अनुष्का आणि प्रभासचे चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत.

या चित्रपटात तीन अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सूत्राने सांगितले. अनुष्का शेट्टीशिवाय इतर दोन अभिनेत्रींची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. हा चित्रपट कॉमिक एंटरटेनर म्हणून ओळखला जातो. निर्माते डीव्हीव्ही दनय्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यासह, असे कळते की निर्मात्यांच्या योजनेनुसार हा चित्रपट दोन किंवा तीन शेड्यूलमध्ये पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर या चित्रपटासंबंधीची उर्वरित माहितीही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

अधिक वाचा-

Back to top button