शिवछत्रपतींची पालखी उद्या बावडा मुक्कामी | पुढारी

शिवछत्रपतींची पालखी उद्या बावडा मुक्कामी

बावडा : पुढारी वृत्तसेवा: किल्ले रायगड येथून 17 जून रोजी पंढरपूर यात्रेसाठी निघालेला शिवछत्रपती पालखी सोहळा बावडा (ता. इंदापूर) मुक्कामी 3 जुलै ला दाखल होत आहे. धारकरी-वारकरी यांचा अनोखा संगम असलेल्या या पायी पालखी सोहळ्याचे हे 8 वे वर्ष आहे. शिवप्रभूंच्या समाधीस्थळावरून निघालेला पालखी सोहळा पाचाड, पळसगाव खुर्द, हरवंडी, आदरवाडी, मुळशी खुर्द, पौड, भूगाव, वानवडी, थेऊर फाटा, यवत, पाटस, कुरकुंभ, शारदानगर, भवानीनगर, वालचंदनगर, गोतोंडी, इंदापूर मार्गे बावडा येथे दि. 3 जुलै रोजी दुपारी पोहोचणार आहे.

या वेळी श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणामध्ये शस्त्र रिंगण सोहळा होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे यांनी दिली. बावडा मुक्कामी पालखी सोहळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर बावडा येथून 4 जुलै रोजी सकाळी पालखी सोहळा माळीनगर (जि. सोलापूर) कडे प्रस्थान ठेवेल. त्यानंतर शिवछत्रपती पालखी सोहळा श्रीपूर, तोंडले, गार्डी, गादेगाव मार्गे 9 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला दाखल होईल.

Back to top button