Hina Khan : हिना ओ हिना! अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट आणि... | पुढारी

Hina Khan : हिना ओ हिना! अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट आणि...

पुढारी ऑनलाईन डेस्क : केवळ मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट करून लक्ष वेधून घेत आहेत असे नाही. छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींचाही यामध्ये समावेश आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानही (Hina Khan) सोशल मीडियात प्रचंड सक्रिय असते. आता तिनेही एक बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यामधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जांभळ्या रंगाची चमकदार पँट आणि बॅकलेस टॉपमधील हिनाचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच हिनाने खूप सुंदर फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हिनाच्या फोटोंना दाद देण्याचा मोह आवडणार नाही. (Hina Khan)

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून हिनाने प्रसिद्धी मिळवली होती. ‘अक्षरा’ या भूमिकेने तिला नवी ओळख मिळवून दिली. अनेक मालिकांमधून हिनाने आपल्या अभिनयाची व सौंदर्याची छाप सोडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हिनाने मस्टर्ड यलो कलरच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केला आहे. यामध्ये तिने खूप सुंदर ज्वेलरी घातली आहे. सोबत हिनाने केसांची पोनीटेल बांधली आहे. हिनाच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांकडून हार्ट इमोजींचा पाऊस पडत आहे. दन दिवसांपूर्वी तिने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. बोल्ड बॅक फ्लॉन्ट करत हिनाने हे फोटोशूट केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

३४ वर्षांची हिनाने डेलीसोपमधून अभिनयाला सुरुवात केली. ये रिश्ता क्या कहलाता हैं या हिंदी मालिकेत तिने अक्षरा नावाचे पात्र साकारले होते ज्यामुळे ती घराघरात पोहोचली. तिची ही भूमिका एक सोज्वळ सूनेपासून सुरू झाली होती. अक्षराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि तिला हिना खान या नावापेक्षा अक्षरा नावानेच प्रसिध्द झाली.

फिटनेस फ्रिक हिना

हिना खान खूप फिटनेस फ्रिक आहे. ती रोज योगा करते. शिवाय जिममध्ये जाणे नित्याचेच असते. डाएट फॉलो करून हिनाने आपली बॉडी मेंटेन ठेवलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

Back to top button