पिंपरी : आई-वडिलांपासून विभक्त केल्याने पतीची आत्महत्या | पुढारी

पिंपरी : आई-वडिलांपासून विभक्त केल्याने पतीची आत्महत्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पतीला आई-वडिलांपासून विभक्त राहण्यासाठी दमदाटी केली. तसेच, पतीला मारहाण करून त्याचा छळ केला. या प्रकाराला कंटाळून शेवटी पतीने आत्महत्या केली. छळवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते 31 मे 2022 या कालावधीत खराडी, चंदननगर आणि आळंदी येथे घडला.

राजू हनुमंत चव्हाण (25) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईक महिलेने गुरुवारी (दि. 23) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू यांची पत्नी, महादेव अंकुश वाघमारे आणि अन्य दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांनी त्यांच्या आई-वडिलांपासून विभक्त राहावे, यासाठी आरोपींनी त्यांना वेळोवेळी दमदाटी केली. आरोपी पत्नीने राजू यांना चारचौघांत मारहाण करून अपमानित केले.
तसेच, राजू यांचा मानसिक छळ केला. त्यामुळे त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button