पाकिस्तानी पंच विकतोय चप्पल

पाकिस्तानी पंच विकतोय चप्पल
Published on
Updated on

लाहोर ; वृत्तसंस्था : एकेकाळचे पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय पंच असद रौफ हे सध्या चप्पलचे दुकान चालवून आपली उपजीविका चालवत आहेत. रौफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि लैंगिक छळप्रकरणी बंदी घालण्यात आली होती.

असद रौफ हे पाकिस्तानमधील सर्वोत्तम क्रिकेट पंचांपैकी एक मानले जातात. असद रौफ यांनी 13 वर्षांच्या कारकिर्दीत 49 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे; पण आता असद रौफ यांचे आयुष्य खूप बदलले आहे, ते सध्या लाहोरमधील एका मार्केटमध्ये चपलांचे दुकान चालवतात.

एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना असद रौफ म्हणाले की, मला आता क्रिकेट या खेळात रस राहिलेला नाही. माझे संपूर्ण आयुष्य खेळण्यात गेले. आता मला खेळायचे नाही. 2013 नंतर मी क्रिकेट सोडले आहे. मी जे काम सोडले, त्यात परत जाणार नाही. मी आता हा छोटासा व्यवसाय करत आहे. काम करावेच लागेल, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काम करणे माझ्या रक्‍तात आहे. मी आता 66 वर्षांचा आहे, अजूनही माझ्या पायावर उभा आहे.

असद रौफ यांच्यावर 2016 मध्ये बीसीसीआयने पाच वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचारात दोषी ठरवले. रौफ यांनी सट्टेबाजांकडून मौल्यवान भेटवस्तू स्वीकारल्या होत्या आणि 2013 च्या आयपीएलदरम्यान मॅच फिक्सिंग प्रकरणातील त्यांची भूमिकाही समोर आली होती.

मॉडेलने केले होते गंभीर आरोप

2012 मध्ये मुंबईतील एका मॉडेलने लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळेही रौफ चर्चेत आले होते. मॉडेलने दावा केला होता की, तिचे पाकिस्तानी अंपायरशी अफेअर होते; कारण त्याने लग्‍न करण्याचे वचनही दिले होते. मात्र, नंतर रौफ यांनी या आरोपांचे खंडन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news