ट्रायकोग्रामाने नायनाट करा शेंदरी बोंडअळीचा | पुढारी

ट्रायकोग्रामाने नायनाट करा शेंदरी बोंडअळीचा

ट्रायकोग्रामाची माशी अतिशय सूक्ष्म असते. ती शेंदरी/गुलाबी बोंडअळ्यांच्या अंड्यात आपली अंडी घालते. त्यामुळे अंडी अवस्थेतच या किडींचा नायनाट होतो. असे ट्रायकोग्रामाची अंडी असलेले ‘कार्ड’ आपणाला विकत मिळू शततात. एका कार्डवर 20 हजार अंडी असतात आणि 2 कार्ड एक एकरासाठी पुरेसे होतात. य प्रमाणात कपाशीचे शेतात ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकांचे कार्ड (दिड ते दोन लाख अंडी प्रति हेक्टरी) 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा पिकात लावावीत. या कार्डच्या विशिष्ट आकाराच्या 20 पट्ट्या कपाशीच्या पानांच्या खालच्या बाजूने अशा लावाव्यात की जेणे करून अंडी असलेला भाग खालच्या बाजूने राहील आणि त्या सारख्या अंतरावर लावल्या जातील.

कपाशीच्या शेतात शेंदरी बोंडअळ्यांची अंडी दिसू लागल्यावर किंवा उगवणीनंतर कपाशी 110 ते 120 दिवसांची झाल्यावर किंवा 8-10 नर पतंग प्रति सापळा सतत 2-3 दिवस आढळल्यास ह्या लावाव्यात. या पट्ट्यावरील अंड्यामधून 7 ते 9 दिवसात ट्रायकोग्रामा प्रौढ बाहेर पडून बोंडअळ्यांच्या अंड्यांचा शोध घेतो आणि त्यामध्ये आपली अंडी घालतो. अशा तर्‍हेने अंडीअवस्थेच शेंदरी बोंडअळ्यांचा नायनाट होतो.

* बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीची आर्थिक नुकसान संकेत पातळी; सरासरी 8 ते 10 नर पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस आडकणे किंवा 5 ते 10 टक्के कळ्या, फुले अथवा बोंडाचे नुकसान किंवा 2 जिवंत अळ्या प्रति 20 किडलेली बोंडे.

* या आर्थिक नुकसान संकेत पातळीनुसार 20 मिली प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा क्‍विनॉलफॉस 25 ईसी किंवा 20 ग्रॅम थायोडिकार्ब 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात या कीटकनाशकांचा सुरूवातीच्या काळात वापर करावा आणि अंतरच्या काळात म्हणजे ऑक्टोबरनंतर 4 मिली स्पिनासॅड 45 एस सी किंवा 10 मिली लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 एस.जी. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

कीटकनाशकांच्या मात्रा पाठीवरील साध्या पंपासाठी आहेत. पॉवर स्प्रेअरसाठी (कीटकनाशकाची मात्रा तीनपटीत अधिक घ्यावी. परंतु एकरी अथवा हेक्टरी शिफारस केलेली मात्रा तेवढीच राहील)
– जयदीप नार्वेकर

Back to top button