हमालीसाठी आता जादा पैसे रेल्वे स्थानकावरील ‘कुलीं’च्या सेवा दरात वाढ | पुढारी

हमालीसाठी आता जादा पैसे रेल्वे स्थानकावरील ‘कुलीं’च्या सेवा दरात वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा: रेल्वे स्थानक म्हटले की डोळ्यांसमोर येतात ‘कुली’. याच कुलींच्या सेवा दरात आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सामानाच्या हमालीसाठी आता नेहमीपेक्षा ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. यासंदर्भातील निर्णय रेल्वेकडून नुकताच घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या भाडे दरापेक्षा पाच ते दहा रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे.

रेल्वे प्रवाशांना नेहमीच्या भाडेदरापेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रेल्वे प्रवाशाची लूट करणारा कुली प्रशासनाकडून निलंबित पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त पैशाची मागणी करणार्‍या एका हमालाला रेल्वे प्रशासनाने निलंबित केले आहे. त्याच्याकडील बॅच जप्त करण्यात आला आहे.

जादा पैसे मागितल्यास तक्रार करा
हमालांच्या सेवेचे वाढलेले दर रेल्वे प्रशासनाने समोरील बाजूस प्रसिध्द केले आहेत. त्यातील दरापेक्षा अधिक पैसे हमालांनी मागितले तर रेल्वेच्या स्टेशनमास्तरांकडे याबाबत तक्रार करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

असे आहेत दर
भाड्याचा प्रकार                     पूर्वीचे           नवे दर
डोक्यावरून भार वाहणे          65 रु.           75 रु.
160 किलोपर्यंत ओझे            105 रु.          120 रु.
आजारी व शारीरिक असक्षम   105 रु.         120 रु.
चार हमाल उचलावे लागणारे   160 रु.         180 रु.

हेही वाचा

नांदेड : पक्षाचा निरोप येण्यापूर्वीच भाजपचे आमदार मुंबईत!

आयडॉल अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून

खरीप मक्याची लागवड

Back to top button