Nia Sharma : नियाची पोझ पाहून नेटकरी बेशुद्ध 🔥, तुझी स्लिम कंबर आणि... | पुढारी

Nia Sharma : नियाची पोझ पाहून नेटकरी बेशुद्ध 🔥, तुझी स्लिम कंबर आणि...

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही ची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने (Nia Sharma) तिच्या जीन्सची बटणे उघडून पोझ दिल्याने सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. आपल्या लूक आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावणारी निया शर्मा पुन्हा एकदा बोल्ड झालीय. कारण आहे तिचे नवीन फोटो, ज्यामध्ये ती फोटोशूटसाठी पोज देताना तिच्या जीन्सची बटणे उघडताना दिसत आहे. (Nia Sharma )

नियाने फ्लॉन्ट केली स्लिम कंबर

या फोटोंमध्ये निया शर्मा तिची टोन्ड फिगर आणि स्लिम कंबर फ्लॉन्ट करत आहे. या फोटोंमध्ये निया अतिशय आत्मविश्वासाने पोज देत आहे. नियाला ७.५ दशलक्ष लोक फॉलो करतात. टीव्ही अभिनेत्री निया ही त्या टीव्ही स्टार्सपैकी एक आहे ज्यांचे इन्स्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.

इंटरनेटचे वाढले तापमान

या फोटोंवर नियाचे खूप कौतुक होत आहे. चाहते या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचेही कौतुक करत आहेत. चाह्तायनी तिला हॉट ब्युटी अशी कमेंट दिलीय. नियाने पहिल्यांदाच फिगर फ्लॉन्ट केलेली नाही. यापूर्वीही तिने अनेक पोझेस दिले आहेत.

मात्र, नियाने पहिल्यांदाच अशा काही पोज दिल्या आहेत की, त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय. याआधीही निया शर्माने पॅन्टची बटणे उघडताना पोज दिली आहे.

मानवीच्या भूमिकेला खूप प्रेम मिळाले

ती ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘नागिन ४’, ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ यासारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ‘एक हजारों में मेरी बेहना है’ या मालिकेतील मानवीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. त्याचबरोबर, तिने वेब सिरीजमध्येही काम केले आहे.

याशिवाय नियाने ‘ट्विस्टेड’ आणि ‘जमाई २.०’ सह काही वेब सीरिजमध्येही काम केले आहे. आशियातील टॉप ५० सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. २०१७ मध्ये ब्रिटीश वृत्तपत्र ईस्टर्न आयच्या आशियातील टॉप ५० सेक्सी महिलांच्या यादीत निया शर्माला दुसरा क्रमांक मिळाला होता. २०१६ मध्ये निया शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर होती.

हेदेखील वाचा-

Back to top button