पूनावाला इंग्रजी माध्यम शाळा सुरू; वालचंद संचेती यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

पूनावाला इंग्रजी माध्यम शाळा सुरू; वालचंद संचेती यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटीला 137 वर्षांचा वारसा लाभला असून रास्ता पेठेसह परिसरातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सीबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे,’ असे प्रतिपादन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी केले.

रास्ता पेठेतील राजा धनराजगिरजी शैक्षणिक संकुलात डॉ. सायरस पूनावाला इंग्रजी माध्यम सीबीएसई बोर्ड शाळेचे उद्घाटन संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग, मानद सचिव बाबूराव जवळेकर, मानद खजिनदार सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, डॉ. मिलिंद तेलंग, जवाहरलाल बोथरा, अ‍ॅड. भगवान बेंद्रे, शशिकांत पवार, दुर्गा देशमुख, मुख्याध्यापिका काजल सोमाई आदी उपस्थित होते.

संचेती म्हणाले, की संस्थेत 15 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे व आधुनिक शिक्षण देणे संस्थेने नेहमीच ध्येय मानले आहे. या ध्येयाशी प्रामाणिक राहून संस्था काम करत आहे. विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित वर्गखोल्या, ई-लर्निंग क्लासरूमची सोय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, लँग्वेज लॅब, विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटे आदी शैक्षणिक सुविधा दिल्या आहेत.

हेही वाचा

पिसाळलेल्या मांजराच्या हल्ल्यात पाचजण जखमी

पिंपरी : आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील दुसरा टप्पा सुरू

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत; शाळा पुन्हा गजबजल्या

Back to top button