Sonam Kapoor baby shower: सोनम कपूरचं उरकलं डोहाळं जेवण (पहा व्हिडिओ) | पुढारी

Sonam Kapoor baby shower: सोनम कपूरचं उरकलं डोहाळं जेवण (पहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सोनमने नुकतेच पती आनंद आहुजासोबत लंडनमधून बेबीबंपचे काही फोटो शेअर करून चाहत्यांनी गुडन्यूज दिली होती. यानंतर सोनमचे प्रेग्नसींचे दिवस जवळ येत असून नुकतेच तिच्या बेबी शॉवरचा (डोहाळे जेवण) ( Sonam Kapoor baby shower ) कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोनमचे नुकतेच बेबी शॉवर (डोहाळे जेवण) ( Sonam Kapoor baby shower ) लंडनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात सोनमच्या बहिणीसह काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. सोनमची बहिण रिया कपूर हिने या सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर झालेल्या व्हिडिओत सोनमच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसले.

यावेळी सोनम पिंक रंगाच्या आउटफिटमध्ये ग्रॉर्जियस दिसत होती. तर मोकळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौदर्यांत आणखी भर घातली होती. यातील खास म्हणजे, सोनमने यावेळी महिलांच्या ड्रेसमध्ये असलेल्या एका पुरूषासोबत फोटो काढून बेबीबंप दाखवले आहे. हा पुरूष म्हणजे, सोहळ्यात परफार्म करण्यास आलेला एका कलाकार आहे.

रियाने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनमला टॅग करत लिहिले आहे की, ‘तो खूपच सुंदर बेबी शॉवर सोहळा होता”. हा फोटो रियाच्या इन्स्टा स्टोरीवर पाहायला मिळतोय. या सोहळ्यातील खास म्हणजे, सोहळ्यात लिओ कल्याण नावाच्या एका कलाकाराने फरफार्मस सादर केला आहे. यावेळी सोनम कपूर ‘मसकली’ गाण्याचा आनंद घेताना दिसली. तर सोनमची बहीण रिया कपूरने ‘मसकली’ गाण्यावर थिरकताना दिसली.

या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ लिओ कल्याणने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोच्या क्रप्शनमध्ये त्याने ‘बॉलिवूडमधील एक हॉट मुलगी. मी नुकतेच सोनम कपूरच्या बेबी शॉवरमध्ये परफॉर्म केले 😳. आयुष्य म्हणजे काय?’ असे लिहिले आहे. यावरूनच सोनमचे डोहाले जेवणाचा कार्यक्रम पार पडल्याचे समजते आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास १५ हजांराहून अधिक लाईक्स केले आहे. याआधीही सोनमने बेबी प्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले होते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Kalyan (@leokalyan)

Back to top button