पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या दिलकश अदांनी आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ पाडणारी दाक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) मनोरंजनविश्वात चर्चेत असणारी अभिनेत्री. आता ती आपल्या परखड वक्तव्याने चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत तिने काश्मिरी पंडित आणि मॉब लिचिंग संदर्भात आपलं मत केली असून यामुळे चर्चेत आली आहे.
साई पल्लवीने एका युट्यूब चॅनेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, तिला तिच्या विचारसरणी बद्दल विचारले असता ती म्हणाली, " मला मी लहान असल्यापासून शिकवण्यात आले आहे की, चांगली व्यक्ती हो, त्यामुळे मी तटस्थ राहण्याला पसंती देते. जर का तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे असाल आणि जर का तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता,"
साई पल्लवीच्या या मतावर सोशल मीडीयावर संमिश्र टीका होवू लागली आहे, काहींनी तिच्या धाडसाचे कौतूक केले आहे तर काहींनी, तु काश्मीर पंडीतासंदर्भात जे वक्तव्य केले आहेस ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर एकजण म्हणतं आहे, दक्षिण भारतीय कलाकार सत्य बोलण्यास भित नाहीत. मला तर साई पल्लवीची बोलण्याची स्टाईल आवडली.
साई पल्लवीचा वेणू उदुगुला दिग्दर्शित 'विराट पर्वम' हा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होतोय. हा चित्रपट ९० च्या दशकातील तेलंगणा राज्यातील नक्षलवादी चळवळीवर आधारित आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत 'बाहुबली' फेम राणा डग्गुबत्तीही मुख्य भूमिकेत असणार आहे. यामध्ये ती एका नक्षलवाद्याच्या प्रेमात असलेल्या तरुणीची भूमिका साकारत आहे. याबरोबरच या चित्रपटात राहुल रामकृष्णा, नंदिता दास, झरीना वहाब, नवीन चंद्रा, ईश्वरी राव ही दिग्गज कलाकार असणार आहेत.
साई पल्लवीच्या दिलखेच अदा नेहमी चाहत्यांना भूरळ पाडणाऱ्या असतात. तिचा दिलकश अंदाज चाहत्यांना आवडतो. साई पल्लवी (Sai Pallavi) आपल्या अभिनयाबरोरचं आपल्या सरळ साध्या व्यक्तिमत्वामूळेही चर्चेत असते. तिचा 'नो मेकअप लूक' चाहत्यांना आवडतो. ती सोशल मीडियावर सक्रीय नसली तरी तिचा सोशल मीडियावर मोठा फॅन वर्ग आहे.