वारकर्‍यांसाठी मोबाईल शौचालय उभारणार; पालख्यांच्या तयारीसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात बैठक | पुढारी

वारकर्‍यांसाठी मोबाईल शौचालय उभारणार; पालख्यांच्या तयारीसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात बैठक

हडपसर, पुढारी वृत्तसेवा: या वर्षी पालखीत लाखो वारकरी असणार, त्यांची सेवा कमी पडायला नको, यासाठी पालिका व पोलिस विभाग प्रशासनाने मिळून कामाचे विभाजन करावे, असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त हडपसर सहायक आयुक्त कार्यालयात महापालिका प्रशासन व पोलिस अधिकार्‍यांची बैठक आमदार चेतन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी महापालिका परिमंडल अधिकारी उपायुक्त संदीप कदम, पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त प्रसाद काटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे उपस्थित होते. या वेळी पालखी आठ ते दहा दिवसांवर आली असून, वारकर्‍यांच्या सेवेसाठी पाणी, रस्ते, आरोग्यसेवा आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे.

भैरोबानाला ते सासवड रोड व सोलापूर रोड मार्गावर 23 ठिकाणी 149 मोबाईल शौचालये उभारण्याची मागणी हडपसर विभागाने केली आहे. रस्त्यावरील खड्डे व सासवड रोडवर वारकरी पायी चालताना ठेच लागून पडू नये, याकरिता रस्त्याची दुरुस्ती करावी, फिरते दवाखाने व औषधसेवा उपलब्ध करून द्यावी, झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे करावीत.

हेही वाचा

श्री संत गजानन महाराज पालखीचे हिंगोलीत स्‍वागत

नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याचे दर्शन, एका वाहनचालकाने केले चित्रीकरण

वारकर्‍यांच्या स्वागताला पुणे सज्ज

Back to top button