Zolzaal Movie : वैशाली सामंतने गायलेले नवे गाणे पाहिले का? | पुढारी

Zolzaal Movie : वैशाली सामंतने गायलेले नवे गाणे पाहिले का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : हास्याची मेजवानी घेऊन येत्या १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस ‘झोलझाल’ (Zolzaal Movie) येणार आहे. या चित्रपटातील ‘फ्री हिट वाला नो बॉल, झाला झोलझाल’ हे गाणे रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास आले आहे. विशेष म्हणजे सुमधुर स्वरांनी हे गाणे गायिका वैशाली सामंत हिने स्वरबद्ध केले आहे. वैशालीच्या या गाण्याने रसिक प्रेक्षक नक्कीच ठेका धरतील यात शंकाच नाही. (Zolzaal Movie)

आजवर वैशालीने गायलेली सर्वच गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. यात वैशालीने ‘झोलझाल’ या चित्रपटातील फ्री हिट वाला नो बॉल हे गाणे उत्तमरित्या गायले आहे. वैशालीचा ‘झोलझाल’ गाण्यातील स्वरसाज आणि मल्टीस्टारर गाण्याची रंगत काही औरच आहे. या गाण्यात चित्रपटातील तब्बल २२ कलाकारांनी एकत्र येऊन त्यांच्या नृत्याने आणि त्यांच्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत.

गाण्याच्या संगीताची संपूर्ण जबाबदारी प्रफुल्ल – स्वप्निल यांनी पेलवली. तर या गाण्याचे बोल गीतकार मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या गाण्यात वापरण्यात आलेले रॅप सॉंगच्या काही ओळी वरुण लिखाते यांच्या आहेत.

या गाण्यात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार आहेत.

या कलाकारांनी गाण्यात केलेला धिंगाणा पाहणे खरच पर्वणी ठरणार आहे यांत शंकाच नाही. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली आहे. सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळलीय.

हेदेखील वाचा-

Back to top button