कोल्हापूर : पत्नीच्या दुसर्‍या लग्‍नाचे फोटो पाहून व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : पत्नीच्या दुसर्‍या लग्‍नाचे फोटो पाहून व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : तीन लहान मुलांना सोडून प्रियकरासोबत गेलेल्या पत्नीच्या दुसर्‍या लग्‍नाचे फोटो पतीच्या मोबाईलवर टाकले. व्यथित पतीने विरहात हातावर ब्लेडने वार करत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. अत्यवस्थ अवस्थेत तीन मुलांनीच त्याला उपचाराला दाखल केले. शहरानजीकच्या एका गावात हा प्रकार घडला.

मोलमजुरी करून गुजराण करणार्‍या एका 32 वर्षीय तरुणाच्या आयुष्यावर हा प्रकार बेतला आहे. या दांम्पत्याच्या पोटी 7, 10 व 13 वर्षांची मुले होती; पण या मुलांना सोडून पाच महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने प्रियकारासोबत पलायन केले होते. दरम्यान, संबंधित विवाहितेने सोमवारी सकाळी पतीच्या मोबाईलवर दुसर्‍या लग्‍नाचे फोटो पाठवले. फोटो पाहून तो व्यथित झाला. त्याने हातावर ब्लेड मारून घेतल्याने तीन मुलांनी आजीच्या मदतीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मंगळवारी सकाळी त्याने पुन्हा झोपेच्या गोळ्या खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

Back to top button