बोगस दस्तावेज तयार करून 49 लाखांचा घातला गंडा | पुढारी

बोगस दस्तावेज तयार करून 49 लाखांचा घातला गंडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  बोगस दस्तावेज तयार करून सुमारे 49 लाख रुपयांचा अपहार करून खासगी कंपनीची फसवणूक झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीची अकाऊंटंट असलेल्या ज्योती विजय साळवी या महिलेविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरू असून अद्याप आरोपी महिलेस अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार व्यवसायाने आर्किटेक्ट असून ते गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांसोबत जुहू परिसरात राहतात. त्यांची एक खासगी कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय विलेपार्ले परिसरात आहे. या कंपनीत त्यांच्यासह त्यांची पत्नी संचालक म्हणून काम करतात. तिथेच ज्योती साळवी ही अकाऊंटंट म्हणून काम पाहत होती. तिच्याकडे कंपनीतील इतर कामगारांच्या कामाची देखदेख ठेवणे, त्यांचे वेतन काढणे तसेच कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणे आदी काम सोपवण्यात आले होते.

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कंपनीचे संपूर्ण कामकाज वर्फ फ्रॉर्म होम स्वरुपात सुरू होते. त्यामुळे ज्योती ही घरातून कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होती. काही दिवसांपूर्वी त्यांचे परिचित सीए मित्र त्यांच्याकडे आले होते. त्यांनी कंपनीचे जीएसटी भरण्यात आले नाही. त्यामुळे मार्चपूर्वी ही रक्कम भरण्याचा सल्ला दिला होता. मात्र मात्र त्यांनी ज्योतीने ही रक्कम आधीच भरल्याचे सांगितले.

मात्र त्यांनी ही रक्कम अद्याप जमा झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना ज्योतीवर संशय आला होता. त्यांनी बँकेतून स्टेटमेंट घेतले असता त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात लाखो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. बँक स्टेटमेंटचे बोगस फोटो कॉपी सादर करून तिने कंपनीत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे आढळले. याबाबत त्यांनी आणखी चौकशी केली असता तिने 2000 ते 2022 या कालावधीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या संयुक्त बँक खात्यातून 49 लाखांचा अपहार केल्याचे ऑडिटमधून निष्पन्न झाले.

Back to top button