Hardeek-Akshaya : राणादा-पाठकबाईं व्हेकेशन टूरवर, रोमँटिक फोटो व्हायरल | पुढारी

Hardeek-Akshaya : राणादा-पाठकबाईं व्हेकेशन टूरवर, रोमँटिक फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये पाठकबाई आणि राणा दा (Hardeek-Akshaya) यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या जोडीने घराघरात आपला एक चाहता वर्ग निर्माण केला. काही दिवसांपूर्वी दोघांनीही एकमेकांशी लग्नगाठ बांधलीय. राणा आणि अंजली (पाठकबाई) आता दोघेही व्हेकेशन टूरवर गेले आहेत. (Hardeek-Akshaya)

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी छोट्या पडद्यावर तुझ्यात जीव रंगला मालिकेतून अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आता एकमेकांचे आयुष्यभराचे साथीदार झाल्यामुळे हे कपल मराठी इंडस्ट्रीत एक दुजे के लिए कपल बनले आहे.

अगदी या दोघांचा साखरपुडा होऊपर्यंत तरी कुणालाही या दोघांच्या नात्याविषयी सम जलं नाही. पण, त्यांनी अचानक साखरपुडा केल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला.

त्यानंतर आता अक्षया आणि हार्दिक सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. हार्दिक आणि अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा रोमँटिक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांनीही या फोटोमध्ये एकसारखा ड्रेस घातला आहे. दोघेही समुद्रकिनाऱ्यावर रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसत आहेत.

कमेंट्सचा पाऊस

हार्दिक आणि अक्षयाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लाईक्सनी त्यांचे इन्स्टाग्रामचे पेज भरले आहे. नेचकऱ्यांनी एकापेक्षा एक कमेंट करत म्हटले आहे- ‘❤️❤️❤️ My Love Birds, You both were always meant 😍, खुप छान मस्त❤️, ❤️ beyond the beauty, Absolutely Adorable ❤️❤️❤️❤️, Mast o vahinisaheb, Nice जोडी❤️❤️❤️❤️❤️❤️, लय भारी❤️❤️❤️❤️❤️😍, ❤️🔥congratulations Rana and Anjali pathak Bai, Always best AD and HJ’

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Back to top button