अखेर न्यायालयातील ‘त्या’ जाळ्या हटविल्या; दैनिक ‘पुढारी’च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे | पुढारी

अखेर न्यायालयातील ‘त्या’ जाळ्या हटविल्या; दैनिक ‘पुढारी’च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातील नवीन इमारतीला लावण्यात आलेल्या जाळ्या न्यायालय प्रशासनाच्या वतीने हटविण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या जाळ्यांवर पालापाचोळा तसेच राडारोडा वाढल्याने जिल्हा न्यायालय कचर्‍याच्या विळख्यात असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रकाशित केले होते.

मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामादरम्यान होणार्‍या स्फोटांमुळे नवीन इमारतीच्या फरशा निखळून अपघात घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने नवीन इमारतीच्या दोन बाजूंना जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मेट्रोचे भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या जाळ्या तशाच ठेवण्यात आल्या. यादरम्यान, जाळ्यांवर पालोपाचोळा, पाण्याच्या बाटल्या तसेच अन्य राडारोडा मोठ्या प्रमाणात साचला होता.

पणजी : आठ मुलींसह 16 तरुण गजाआड, बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलिसांची धाड

तो न काढल्याने या जाळ्या खाली लोंबू लागल्या होत्या. तसेच, स्वच्छतेअभावी इमारतीच्या विद्रुपीकरणात भर पडत चालली होती.
इमारतीच्या प्रवेशद्वारावर राडारोडा असल्याने वकील वर्गाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

पावसाच्या पार्श्वभूमीवर या कचर्‍यामध्ये पाणी साठून अस्वच्छता तसेच दुर्गंधीचा सामना वकील व पक्षकारांना करावा लागणार असल्याचे ‘पुढारी’ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, लगोलग प्रशासनाने जाळ्या हटविण्याचे काम हाती घेतले आहे.

Back to top button