ओडिशाच्या ‘या’ अप्सरावर रामगोपाल वर्मा फिदा! | पुढारी

ओडिशाच्या ‘या’ अप्सरावर रामगोपाल वर्मा फिदा!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सध्या वेगळ्याच धुंदीत धुंद असल्याचे दिसत आहे. याला कारणच तसेच आहे, त्यांच्या आगामी ‘थ्रिलर’ या चित्रपटाच्या नायिकेचे कौतुक करताना थांबत नाहीत. विशेष म्हणजे त्यांनी एक ट्विट करत ही आपल्या आगामी चित्रपटाची नायिका असल्याचे सांगत तिचे एका पाठोपाठ एक आठ फोटो शेअर केले. रामगोपाल वर्मांनी शोधलेल्या या नायिकेने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.  

'क्‍लाइमेक्‍स' और 'नेकेड' के बाद 'थ्र‍िलर' बनाएंगे RGV

एक काळ असा होता की, राम गोपाल यांचे चित्रपट पाहताच हॉलिवूडची आठवण यायची. रंगीला, सत्या, जंगल, कंपनी, रोड, रक्त चरित्र असे अनेक नावाजलेले चित्रपट त्यांनी दिले आहेत. आता त्यांनी ‘क्लाइमेक्स’ आणि नेकेड या चित्रपटानंतर ‘थ्रिलर’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांनी एका ओडिसातील अभिनेत्रीला या चित्रपटात घेतले आहे. या नायिकेचे नाव अप्सरा रानी आहे. 

राम गोपाल ने तूफान से कर दी तुलना

रामगोपाल वर्मा यांनी सोमवारी एक ट्वीट केले, यात त्यांनी म्हटले आहे, ‘ आरजीव्ही वर्ल्ड थियटरचा पुढील चित्रपटाची नायिका अप्सरा रानी असून या चित्रपटाचे नाव थ्रिलर असेल. ‘क्लायमॅक्स’ आणि ‘नेकेड’ च्या यशानंतर हा पुढील चित्रपट असेल. या ट्विट नंतर रामगोपाल वर्मा यांनी अप्सराचे एकामागोमाग एक ८ फोटो शेअर केले. 

या पोस्टमध्ये रामगोपाल वर्मा यांनी सांगितले की, अप्सरा ही ओडिसाची आहे. तिचा जन्म ओडिसा मध्ये झाला आणि ती देहरादून येथे मोठी झाली. सध्या अप्सरा ही हैदराबादमध्ये रहात आहे. राम गोपाल वर्मांच्या सांगण्यानुसार अप्सरा ही एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे आणि त्याहून चांगली अभिनेत्री आहे.  

7 घंटे में 10 हजार फॉलोअर्स बढ़े

एक महत्त्वाची गोष्ट की, राम गोपाल वर्मा यांनी हे ट्वीट करताच फक्त ७ तासात ट्विटरवर अप्सराचे १० हजार फॉलोअर्स वाढले. राम गोपाल वर्मा यांचा उल्लेख करत म्हणाले की, एखाद्या नव्या कलाकारासाठी हे एक रेकॉर्ड आहे. अप्सराने जुलै महिन्यात ट्विटरवर आपले अकॉउंट उघडले आहे. ही बातमी येऊ पर्यंत माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवर तीचे २१.७ के इतके युजर्स फॉलो करु लागले आहेत. 

'थ्र‍िलर' के सेट से ड‍िनर की तस्‍वीर

ट्वीटरवर राम गोपाल वर्मांनी लिहले की, १९९९ मध्ये ओडिसात आलेले वादळ सोडून मला ओडिसा बद्दल अधिक माहिती नाही. पण, अप्सराला भेटल्यानंतर असे जाणवलं की, ओडिशा अनेक प्रकराचे वादळ उठवू शकतो. पण, ही गोष्ट युजर्सला काही रुचली नाही, त्यामुळे यावर राम गोपाल वर्मा खूप ट्रोल झाले आहेत.

आधी रात को एक्‍साइटमेंट का हाल

राम गोपाल वर्मा यांनी ‘थ्रिलर’ च्या सेट वरील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते आणि अप्सरा एकत्र रात्रीचे जेवण करताना दिसत आहेत. तसेच  ‘परी सारख्या अप्सरा सोबत रात्री जेवण घेताना’ असे ट्वीट केले आहे. 

शिवाय अप्सराने देखील मध्यरात्री आपला एक फोटो पोस्ट कर लिहले की, अर्धी रात्र संपली पण, मी खूप उत्साहित आहे. माझे १५००० फॉलोअर्स झाले आहेत. यावर रामगोपाल वर्मा यांनी लिहले की, एक शंका आहे, रात्रीच्या १२ : ५९ वाजले असताना हा फोटो काढला कोणी ? यावर अप्सराने उत्तर दिले, माझ्या आई हा फोटो काढला असून ती एक चांगली फोटोग्राफर आहे. 

सोशल मीडियातील युजर्स सुद्धा हेच म्हणत आहेत की, नावा प्रमाणेच ही अत्यंत सुंदर नायिका आहे. उप्सराने या आधी ऊलाला ऊलाला आणि फोर लेटर्स या चित्रपटात काम केले आहे.

Back to top button