बाहुबली प्रभासचा येतोय नवीन चित्रपट | पुढारी

बाहुबली प्रभासचा येतोय नवीन चित्रपट

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘बाहुबली’ स्टार प्रभासचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान प्रभासच्या आगामी ‘राधे- श्याम’ चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडेचा रोमांन्स पाहायला मिळणार आहे.

वाचा : कोरोना काळात जॅकी श्रॉफ यांचा मदतीचा हात 

प्रभास आणि पूजा हेगडेने सोशल मीडियावर ‘राधे- श्याम’ या चित्रपटाचा लूक शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या चाहत्यांनो, हे तुमच्यासाठी आहे. आशा आहे की, आपल्याला हे आवडेल. #Prabhas20FirstLook #RadheShyam.   

वाचा :दुबेच्या एन्काऊंटरवर तापसी म्हणाली…

या चित्रपटात भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सत्यन यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.’राधे- श्याम’ चित्रपटाचे हिंदी वर्जन टी- सीरीज घेऊन येत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाल्यानंतर ट्विटरवर तो नंबर वन ट्रेंड बनला आहे.’राधे- श्याम’ हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.  याआधी प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’ हा चित्रपट येवून गेला होता. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

(photo : actorprabhas instagram वरून साभार)

 

 

Back to top button