बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड | पुढारी

बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

मुंबई : पुढारी ऑनलाईन

काही दिवसापासून बॉलीवडूला एकवर एक धक्के बसत आहे.  इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपूत या दिग्गजांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत. तोपर्यंत आणखी धक्का बसला आहे. बॉलीवूडने आणखी एक दिग्गज गमवला आहे. ‘प्यार तुने क्या किया’, ‘रोड’ चित्रपटाचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले. 

रजत मुखर्जी हे गेल्या काही दिवसापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.  मुंबईत वास्तव्यास असणारे रजत मुखर्जी लॉकडाऊन काळात त्यांच्या शहरात जयपूरमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी जयपूरमध्येच अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते किडनीच्या समस्येला तोंड देत होते. 

अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझे मित्र आणि रोड या सिनेमाचा दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे जयपूरमध्ये निधन झाले. तुझ्या आत्म्यास शांती लाभो… आता आपण कधीच भेटू शकणार नाही, पुन्हा कधीच एकत्र काम करू शकणार नाही, यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये, जिथे आहेस, तिथे आनंदी राहा,’ असे वाजपेयीने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

रजत यांनी प्यार तूने क्या किया, रोड, उम्मीद, लव इन नेपाल अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Back to top button