बहिणीसाठी अक्षय कुमारचं ‘हे’ मोठं गिफ्ट!  | पुढारी

बहिणीसाठी अक्षय कुमारचं 'हे' मोठं गिफ्ट! 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

रक्षाबंधनाच्या निमित्ताचे बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘रक्षाबंधन’ असे आहे. आनंद एल राय दिग्दर्शन करणार असून अक्षय कुमारने हा चित्रपट आपल्या बहिणीला समर्पित केला आहे. 

अक्षयने सांगितलं की, आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने हा सर्वात लवकर साईन केलेला चित्रपट आहे.

रक्षाबंधन हा चित्रपट ५ नोव्हेंबर, २०२१ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपल्या ४ बहिणींसोबत तो यामध्ये दिसत आहे. हे पोस्टर इन्स्टावर शेअर करत अक्षयने लिहिलं आहे की- आयुष्यात खूप कमी वेळा असं होतं की, एखादी कहाणी आपल्या मनाला भावते. माझ्या करिअरमध्ये मी हा सर्वात लवकर साईन केलेला चित्रपट आहे. ही कहाणी तुम्हाला हसवेल आणि रडवेलही. हा चित्रपट तुम्हाला अनुभूती देईल की, ते लोक किती भाग्यवान आहेत, ज्यांच्याकडे बहिणी आहेत. 

या चित्रपटाची कथा हिमांशु शर्माने लिहिली आहे.



 

Back to top button