तर मग मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊ नका, शिवसेनेचे मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर | पुढारी

तर मग मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊ नका, शिवसेनेचे मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ट्विट केलं आहे. मुंबईत माणुसकी हरवली आहे. मुंबई असुरक्षित असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता या ट्विटला शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची सुरक्षा कवच (Security Cover) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !!’ असे ट्विट करत युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मिसेस फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

‘सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून असं वाटतं की, मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित नाही’, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. यावरून शिवसेना आणि अमृता फडणवीस यांच्यातील ट्विटर वॉर रंगलं आहे. 

पाटणाच्या एसपींना थेट क्वारंटाईन 

बिहारहून मुंबईत आलेले पाटणाचे एसपी तिवारी यांना बीएमसीने थेट क्वारंटाईन केले आहे. गोरेगाव येथे त्यांना खासगी स्थळी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी जे झालं ते योग्य झालं नाही, असे म्हणत सरकारवर टिका केली. 

 

Back to top button