२८ दिवसांनंतर ज्युनिअर बच्चन कोरोनामुक्त! | पुढारी

२८ दिवसांनंतर ज्युनिअर बच्चन कोरोनामुक्त!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बच्चन कुटुंबातील सर्व सदस्यांनंतर आता बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने देखील कोरोनावर मात केली आहे. तब्बल २८ दिवसांनंतर ज्युनिअर बच्चन कोरोनामुक्त झाले आहेत. ही माहिती खुद्द अभिषेकने ट्विट करत आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

काय म्हटले आहे ट्विटमध्ये अभिषेक बच्चनने…

एक वचन म्हणजे एक वचन! आज दुपारी माझी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मी तुम्ही सर्वांना सांगितले होते की मी या आजारावर मात करेन. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केलात त्यासंबंधी धन्यवाद. नानावटी रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांनी केलेल्या उपचाराचा मी कायमस्वरूपी आभारी आहे. THANK YOU!’ 

अभिषेकनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्विट करत अभिषेकची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. तसेच, अभिषेकला डिस्‍चार्ज दिला असून तो आता घरी येण्याच्या मार्गावर असल्याचे बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच देव महान आहे. असे सांगत बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभारदेखील बच्चन यांनी मानले आहेत. 

करोनाची लागण झाल्यानंतर अभिषेकवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.

बच्चन परिवाराने केली कोरोनावर मात 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, नात आराध्या बच्चन यांचा सर्वांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अगोदर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यानंतर नानावटी रूग्णालयातून महानायक अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज मिळाला.

आता अभिषेक बच्चनने कोरोनावर मात केली आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो आता घरी येत आहे, अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन दिली आहे. 

Back to top button