रियाची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू | पुढारी

रियाची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी होत आहे. आज (दि. १०) सकाळी ११ वाजता रिया बेलार्ड पीयर येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाली.  दरम्यान शुक्रवारी (दि. ७) दुपारी रियाची ईडी अधिकाऱ्यांनी रियाची कसून चौकशी केली. त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी रियाला विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता आली नव्हती. रिया आणि तिच्या भावाच्या संभाषणात तफावत जाणवत असल्यानेच आज पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे आज काय खुसाला होणार याकडे अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या फॅमिलीसह त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सुशांतच्या खात्यातून १५ कोटी काढल्याचा आरोपही सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. 

दरम्यान, बिहार पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच ईडीने या गुन्ह्याच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणी रिया चक्रवर्तीसह सुशांतचे सीए संदीप श्रीधर, नोकर सॅम्युअल मिरांडा यांचाही जबाब नोंदवला आहे. त्यानंतर ईडीने गुरुवारी रियाला चौकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. 

Back to top button