'सूर-ए-मल्‍लिका' आशा भोसले  | पुढारी | पुढारी

'सूर-ए-मल्‍लिका' आशा भोसले  | पुढारी

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुरांची मल्‍लिका आशा भोसले यांचा ८ सप्टेंबरला वाढदिवस आहे. आशा यांचा जन्म १९३३ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे झाला होता. आशा यांनी वयाच्या १० व्या वर्षी गायकी सुरू केली होती. त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या औचित्‍याने आयुष्‍याविषयी थोडक्‍यात जाणून घेऊयात. 

आशा भोसले यांनी १९४८ मध्ये चित्रपटासाठी पहिले गाणे गायले होते. ‘चुनरिया’ नावाच्या चित्रपटामध्ये ‘सावन आया रे’ हे गाणे त्यांनी जोहराबाई अंबालेवाली आणि गीता दत्त यांच्यासोबत गायले होते. त्‍यांनी आतापर्यंत १२ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. तब्‍बल २० विविध भाषा असणार्‍या १ हजारांहून अधिक चित्रपटांसाठी त्‍यांनी गाणी गायली आहेत. 

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्‍टेंबर १९३३ ला झाला. त्‍यांना बालपणापासून गाण्‍याची आवड होती. १० वर्षांची असताना त्‍यांनी गाणे गाण्‍यास सुरूवात केली. पुढे त्‍यांच्‍या जादूई आवाजाने प्रेक्षक मनावर रुंजी घातली.  

Image

आशा भोसले स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्‍या लहान बहिण आहेत. त्‍यांचे वडील दीनानाथ मंगेशकर प्रसिध्‍द शास्‍त्रीय गायक होते. वडिलांच्‍या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी लता मंगेशकर यांच्‍यावर आली. बहिणीला साथ देण्‍यासाठी आशा भोसले यांनी गाणी गाण्‍यास सुरुवात केली. लहान असताना लतादीदींना पाहून आशाजी रियाज करायच्‍या. एकदा लता मंगेशकर शाळेला जात होत्‍या. त्‍यावेळी आशा देखील शाळेला जाण्‍यासाठी तयार झाल्‍या. त्‍यावेळी फक्‍त लतादीदीच शाळेला जायच्‍या. लतादिदी आशाजींना सोबत घेऊन शाळेत गेल्‍या. शिक्षक दोघींना पाहून ओरडले. तसेच एका फीमध्‍ये दोन मुलांचं शिक्षण होत नसल्‍याचं ते म्‍हणाले. शिक्षकांनी ओरडल्‍यानंतर आशा-लता दोघीही रडत घरी परतल्‍या. दीनानाथ मंगेशकर यांना ज्‍यावेळी हे समजलं की, आपल्‍या मुली शाळेसाठी रडल्‍या आहेत, त्‍यांना खूप वाईट वाटलं. त्‍यामुळे अशा शाळेत न पाठवण्‍याचा निर्णय त्‍यांनी घेतला; जिथे, शिक्षकच मुलांना रडवतात. 

Image

आशा भोसले यांचं खासगी आयुष्‍य 

आशा भोसले यांच्‍या आवाजात गोडवा असूनही त्‍यांचे खासगी आयुष्‍य कटू गोष्‍टींनी भरलेलं होतं. त्‍यावेळी लता मंगेशकर यांना त्‍यांच्‍या गाण्‍यांमुळे बरीच प्रसिध्‍दी मिळाली होती. त्‍यांचं काम सांभाळण्‍यासाठी त्‍यांचे पर्सनल सेक्रेटरी गणपतराव भोसले होते. ते लतादीदींचं काम सांभाळत असतं. गणपतराव यांच्‍याशी आशा भोसले यांना प्रेम झालं. परंतु, मंगेशकर कुटुंबीय त्‍यांच्‍या लग्‍नासाठी तयार नव्‍हते. दोघांनी घरातून पळून जाऊन लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यावेळी आशा भोसले १६ वर्षाच्‍या होत्‍या आणि गणपतराव ३१ वर्षांचे. दोघांनी लग्‍न केलं. परंतु, त्‍यांचं नातं फार काळ टिकलं नाही. गणपतराव यांच्‍या फॅमिलीने आशा भोसलेंना स्‍वीकारलं नव्‍हतं. ते आशाजींना मारहाणही करण्‍याचा प्रयत्‍न करत करायचे. शेवटी एके दिवशी गणपतराव यांनी आशा भोसले यांना घराबाहेर काढलं. त्‍यावेळी आशा भोसले प्रेग्नेंट होत्‍या. ही माहिती खुद्‍द आशा भोसले यांनी एका मुलाखतीत दिली होती. सासरमधून बाहेर काढल्‍यानंतर त्‍या आपल्‍या दोन मुले हेमंत आणि वर्षा यांच्‍यासोबत पुन्‍हा माहेरी परतल्‍या होत्‍या. 

Image

आशा यांना आतापर्यंत फिल्मफेयर ॲवॉर्डमध्ये ७ बेस्ट फिमेल प्लेबॅक पुरस्‍कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. आशा भोसले यांना २००८ मध्ये तत्‍कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. 

आशा यांची ही सदाबहार गाणी आजदेखील संगीतप्रेमींच्या ओठांवर रुळतात.

Image

लेके पहला पहला प्यार(१९५६ – फिल्म सीआईडी )

– अभी न जाओ छोडकर(१९६१ – आई फिल्म हम दोनों )

– उडे जब-जब जुल्फें तेरी(१९५७ – फिल्म नया दौर)

– कजरा मोहब्बत वाला(१९६८- फिल्म किस्मत)

– दो लफ्जों की है दिल की कहानी(१९७९-फिल्म- द ग्रेट गैम्बलर )

– इन आंखों की मस्ती के(१९८१-फिल्म उमराव जान)

– दिल चीज क्या है मेरी(१९८१-फिल्म उमराव जान)

– अजनबी मुझको इतना बता(१९९८ – फिल्म प्यार तो होना ही था)

– राधा कैसे न जले(२००१- फिल्म लगान )

– ये लडका हाय अल्लाह

– छोड दो आंचल…

– मैं चली..मैं चली

– जवानी जानेमन

– दम मरो दम

– पिया तू अब तो आजा

– ओ मेरे सोना रे

– आइए मेहरबान

– रात अकेली है

 

 

Back to top button