‘ड्रामा क्वीन’ कंगनाकडून मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख (Video) | पुढारी

'ड्रामा क्वीन' कंगनाकडून मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख (Video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आज माझं घर तुटलंय, उद्या तुझा घमंड तुटेल, असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कंगना घरी पोहोचली. मुंबईत येताच तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. या व्हिडिओत तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. 

वाचा – कंगनाला दिलासा, मुंबई पालिकेच्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती 

कंगनाच्या वकिलाची हायकोर्टात याचिका (video)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करत कंगनाने मुंबईचा अपमान केला होता. मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलेय, असे तिने म्हटले होते. शिवाय पोलिसांवरही अविश्वास दाखवल्याने तिच्यावर टिका झाली. राऊत यांनी कंगनाला मुंबईत येण्यास रोखले होते. परंतु, कंगनाने आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येऊन दाखवू, असा निर्णय घेतला. त्यानुसार, ती आज हिमाचल प्रदेशमधून मुंबई विमानतळावर दाखल झाली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी कंगना विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रिपाइंचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते. अखेर पोलिसांच्या सुरक्षेत कंगना आपल्या घरी पोहोचली. 

वाचा – कंगनाकडून बेताल वक्तव्ये, कारवाई तर होणारच : महापौर पेडणेकर

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर बीएमसीचा हातोडा (video)

Back to top button