होय मला ड्रगची चटक लागली होती असं खुलेआम सांगणाऱ्या ड्रामेबाज कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल! | पुढारी

होय मला ड्रगची चटक लागली होती असं खुलेआम सांगणाऱ्या ड्रामेबाज कंगनाचा 'तो' व्हिडिओ व्हायरल!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कंगना राणावत आणि शिवसेना वादात एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारने कंगनाच्या विरोधात ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. बेकायदा बांधकाम केल्याच्या आरोपावरून बीएसीने कंगनाचे कार्यालय जेसीबीने पाडल्यानंतर दोन दिवसांनी हा तपास सुरू झाला आहे. दरम्यान, कंगनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सांगतेय की तिला एकदा ड्रगची चटक लागली होती.

या व्हिडिओमध्ये कंगना राणावत म्हणते की, जशी मी घरातून पळून आले, एक दीड वर्षात मी फिल्मी स्टार होते, ड्रग्जच्या आहारी गेली होती. माझ्या आयुष्यात असे बरेच कांड चालू होते. मी अशा लोकांच्या हाती लागली होती तिथं सर्वकाही धोकादायक झाले होते. जेव्हा हे सर्व घडत होते तेव्हा मी किशोरवयीन होते. कंगनाने मार्चमध्ये हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.

कंगनाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूझर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले की, अभिनेता सुमनच्या टिप्पणीच्या आधारे कंगनावरील ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाची चौकशी केली जाईल. कंगनाला डेट केलेल्या अध्ययन सुमनने २०१६ च्या मुलाखतीत, कंगनाने त्याला २००८ मध्ये एका पार्टीत ड्रग्ज घेण्यास सांगितले होते असा आरोप केला होता. 

Back to top button