अनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल! | पुढारी

अनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दक्षिण भारतीय चित्रपटांतील अभिनेत्रीने दिलेल्या फिर्यादीवरून चित्रपट दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसात गुन्हा नोंदविला गेला. कश्यप याने वर्सोवात २०१३ मध्ये आपल्या कार्यालयात बोलावून अभिनेत्रीचा विनयभंग केला. तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला, असा त्याच्यावर आरोप आहे. 

वर्सोवा पोलिस लवकरच कश्यपला चौकशीसाठी बोलवतील. त्याला अटकही होऊ शकते. अभिनेत्रीचे वकील नितीन सातपुते यांनी बुधवारी ही माहिती दिली. अनुरागच्या बचावार्थ त्याच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी पुढे आल्या आहेत. रिया चढ्ढा, हुमा कुरैशी आदी अभिनेत्रींनीही अनुरागसाठी आघाडी उघडली आहे. दुसरीकडे कंगना राणावतने अनुराग कश्यपचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 

यात व्हिडीओमध्ये तो (कश्यप) एका मुलाचे शोषण केल्याची कबुली देताना दिसत आहे. आणखी एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. यात कश्यप मुलाखत देत असतानाच तोंडाने श्‍वासाद्वारे काही तरी घेत असल्याचे दिसत आहे. तो जाहीरपणे ड्रग्ज घेतल्याचा दावा हा व्हिडीओ ट्विट करणार्‍याने केला आहे.

दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकूल प्रीत सिंगला तीन दिवसात चौकशीला हजर राहण्याचे आदेश!

तर कंगनाची चौकशी करा, भाजपची मागणी

अभिनेत्री पूनम पांडेची पतीविरोधात मारहाण, विनयभांगाची तक्रार 

अनुराग कश्यपवर पायलचा लैंगिक शोषणाचा आरोप

पूर्वाश्रमीच्या दोन पत्नींकडून अनुरागची पाठराखण

लैगिक शोषण : अनुराग कश्यपचे पायल घोषला प्रत्युत्तर, म्हणाला…

Back to top button