ड्रग्ज प्रकरण – आता शाहरुख, रणबीर NCB च्या रडारवर | पुढारी

ड्रग्ज प्रकरण - आता शाहरुख, रणबीर NCB च्या रडारवर

मुंबई : वृत्तसंस्था

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल व डिनो मोरिया यांची नावे समोर आली आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या चौकशीत ड्रग्ज तस्करांनी त्यांची नावे घेतली असल्याचे वृत्त  एका हिंदी वृत्तपत्राने  दिले आहे.

आतापर्यंत फक्‍त अभिनेत्रींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर येत होती. पहिल्यांदाच मोठ्या अभिनेत्यांची नावे समोर आल्याने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दिल्‍लीतील एनसीबीच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर बॉलीवूडमधील या अभिनेत्यांची नावे उघड केली आहेत. कालपर्यंत ए, डी, आर आणि एस या आद्याक्षराने सुरू होणार्‍या अभिनेत्यांची नावे असल्याचे सांगितले जात होते.

यामध्ये एस म्हणजे शाहरुख खान, आर म्हणजे रणबीर कपूर, ए म्हणजे अर्जुन रामपाल तर डी म्हणजे डिनो मोरियो असल्याचे एनसीबीच्या एका अधिकार्‍याने सांगितले आहे. अर्जुन रामपाल शाहरुख खानला ड्रग्जचा पुरवठा करीत असल्याचे ड्रग्ज तस्करांनी सांगितले आहे. मात्र डिनो मोरियाला पुरवठा कोणी केला, याबाबत अद्याप चौकशी सुरू असल्याचे संबधित अधिकार्‍याने सांगितले.

आज अनुराग कश्यपची होणार चौकशी

सिनेनिर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप याला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उद्या गुरुवारी अनुराग वर्सोवा पोलिस ठाण्यात हजर राहणार असून त्यांची जबानी नोंदविली जाणार आहे. या जबानीनंतर त्यांच्या अटकेवरील कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सिनेअभिनेत्री पायल घोष हिने अनुरागवर अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 

Back to top button