सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या, ‘एम्स’चा रिपोर्ट | पुढारी

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या, ‘एम्स’चा रिपोर्ट

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच होती, असा रिपोर्ट एम्सने दिल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.  

सुशांतची हत्या झाली नाही, असे एम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात मिळाल्यानंतर त्याच्या मृत्यूवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. सुशांत आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या झाली आहे, असे काही दिग्गजांचे म्हणणे होते. सुरूवातीला मुंबई पोलिसांकडून तपास झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. 

वाचा – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी एम्सचा अहवाल आला!

आता एम्सने सुशांतच्या मृत्यूबाबत रिपोर्ट दिला आहे. सुशांतची हत्या नसून आत्महत्या झाल्याचे एम्सने म्हटले आहे. 

याबाबत काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. – 

* मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडघशी पडले आहेत. सुशांतच्या आत्महत्येचं राजकीय भांडवल केलं गेलं. – आमदार प्रताप सरनाईक 

* पोलिसांवर आरोप करणाऱ्यांचे डोळे उघडले असतील.- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  

* बातम्या विशिष्ट हेतूने पेरल्या जात आहेत.- रियाचे वकील 

वाचा – सुशांतप्रकरणी हत्येचे कलम; सीबीआय तपासाला नवे वळण

Back to top button