

करीना आणि सैफ ही बॉलिवूड जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता करीनाने सैफ बरोबरच्या सेक्स लाईफबद्दल भाष्य करत त्यात अजूनच भर घातली आहे. करीना कपूर खानने आपल्या गरोदरपणातील अनुभवांवर एक पुस्तक लिहीले आहे. सध्या हे पुस्तक आणि पर्यायाने करीना, सैफ आणि त्यांची मुलं देखील प्रकाशझोतात आले आहे.
हे गरोदरपणातील पुस्तक करीनाने दिग्दर्शक करण जोहर सोबत इन्स्टा लाईव्ह करत प्रकाशित केले. या पुस्तकात बेबोने अनेक खुलासे केले आहेत. त्यातील सध्याचा चर्चेतला खुलासा म्हणजे करीने सैफच्या दुसऱ्या मुलाचे जेहच्या नावाचा फूल फॉर्म जहांगीर असा आहे.
दरम्यान, पुस्तक प्रकाशनावेळी करीनाला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. बेबोने गरोदरपणात तिच्या आयुष्यात काय बदल झाले हे तिने सांगितले. करीनाने पहिल्या गरोदरपणात जास्त त्रास झाला नाही मात्र जेहच्या वेळी फार त्रास झाल्याचे सांगितले.
त्यानंतर करीना आपल्या आणि सैफ बरोबरच्या सेक्स लाईफ बद्दल देखील बोलली. ती म्हणाली 'गर्भवती असताना स्त्रीला पुरुषाने आधार देणे गरजेचे असते. ती सुंदरच दिसावी असा दबाव तिच्यावर टाकू नये. ज्यावेळी आपण गर्भवती असतो त्यावेळी जोडीदाराला आपल्याला सेक्सची भावना उत्पन्न होत नाही असे वाटत असते. खरंतर आपल्यालाच माहित नसतं की आपल्याला काय वाटत असतं. त्यावेळी तुमच्या जोडीदाराने तुम्हाला आधार द्यावा लागलो. मला सैफने खूप आधार दिला.'
करीना पुढे म्हणाली, 'गरोदरपणात स्त्री स्वतःला आपण खूप खास आणि सेक्सी आहोत असे समजच असते. सैफनेही हे मान्य केले आहे. गरोदरपणात करीना फार छान दिसत होती असे तिचे म्हणणे आहे.' करीना म्हणाली की, गरोदरपणाच्या सहाव्या आणि सातव्या महिन्यात खूप दमछाक होते. त्या काळात जोडीदाराचा आधार आणि समजुदारपणा खूप गरजेचा असतो. अशा स्थिती जोडीदाराने सेक्स लाईफ सुपर अॅक्टिव राहण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
गरोदरपणात प्रत्येक महिन्याला प्राधान्य दिलं पाहिजे असे करीना म्हणते. सगळं काही गरोदर महिलेच्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे. ही गोष्ट जर तुमच्या जोडीदाराला कळाली नाही तर तो तुमच्या मुलांचा बाप कसा असू शकतो? त्याला तुम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : ब्रा आणि बुब्जवर मी बोलले कारण..
https://youtu.be/pwbK_–MP4s