रंग माझा वेगळा : कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला नाव देण्याचा अधिकार

‘रंग माझा वेगळा’ : कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला नाव देण्याचा अधिकार
‘रंग माझा वेगळा’ : कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला नाव देण्याचा अधिकार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकने स्वत:च्या मुलीला नाव देण्याचा अधिकार नाकारला आहे. रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

अधिक वाचा  –

दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. पण, नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे.

दीपा एका मुलीला एकटी वाढवणार
दीपा एका मुलीला एकटी वाढवणार

मुलीला एकटी वाढवणार

जन्मानंतर दीपाचं एक बाळ तिच्यापासून दूर झालंय. तर दुसऱ्या बाळाचं पितृत्वच तिच्या वडिलांनी म्हणजेच कार्तिकने नाकारलं आहे.

त्यामुळे दीपाने आता माझी मुलगी वडिलांच्या नावाची भीक मागणार नाही, असं ठणकावून सांगत एकटीने मुलीला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दीपा-कार्तिकच्या नात्यातली कटुता मुलींच्या जन्मानंतर तरी दूर होईल असं वाटत होतं. सौंदर्याने पुढाकार घेत या दोघांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर दीपाची एक मुलगी आपल्या घरात आणून कार्तिकचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नाहीये.

त्यामुळे दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे.

त्यासाठी पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news