सागरिका शोना सुमन हिने पोर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणातील राज कुंद्रा याच्यावर आरोप केल्यानंतर तिने आता उल्लू ॲपचे मालक विभु अग्रवाल यांच्यावर आरोप केला आहे.
एका माध्यमाला मुलाखत देताना मॉडेल सागरिका शोना सुमन म्हणाली की, विभु अग्रवाल यांच्या सोबतच्या पहिल्या भेटीत आपल्या अतिशय भयानक आणि वाईट अनुभव आला. यावेळी सागरिकाने उल्लू ॲपच्या एका निर्मात्याने माझ्याकडे न्यूड क्लीपची मागणी केल्याचा आरोप केला.
शिवाय यावेळी उल्लू डिजिटल प्राइव्हेट लिमिटेडवर आरोप करताना सागरिका म्हणाली की, उल्लू वाले हार्डकोर पोर्न दाखविणारे ॲप चालवित आहेत. सध्या माझे वकील इतर कामात व्यस्त आहेत. ते रिकामे झाल्यावर आपण विभु अग्रवाल यांच्यावर घटला दाखल करणार असल्याचे सागरिका शोना सुमन हिने यावेळी सांगितले.
यापूर्वी सागरिका हिने पोर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी सध्या तुरुंगात असणाऱ्या राज कुंद्रावर ही आरोप केला होता. राज कुंद्रा याने आपल्याकडे न्यूड ऑडिशनची मागणी केली होती, असा आरोप सागरिकाने राज कुंद्रावर केला होता.
विभु अग्रवाल वर आरोप करताना सागरिका म्हणाली की, जानवारी २०२० मध्ये पनवेलमधील एका स्टुडिओमध्ये हर्ष नावाच्या निर्मात्याने आपल्याशी संपर्क साधून सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की काही बोल्ड सीन शूट करायचे आहेत आणि यामध्ये फक्त आपले क्लिवेज दाखविले जातील.
सागरिका पुढे म्हणाली, तो पर्यंत आपणास चित्रपटाची पूर्ण स्टोरी सांगितली गेली नव्हती. ज्यावेळी मी सेट वर पोहचले तेव्हा पाहिले की, दोन मॉडेल लेसबीयन सीनचे शुटींग करत होत्या. त्या दोघी मद्यधुंद अवस्थेत होत्या. हे चित्र पाहून मी खूपच घाबरले आणि तेथून पळ काढला.
यानंतर मी हर्ष यांच्याशी संपर्क साधून म्हणाले की, या प्रकारचा कोणताही चित्रपट मला करायचा नाही. तुम्ही पोर्न कंटेन्टचे शुटींग करत आहात.
यासंदर्भात सागरिकाने पुढे सांगितले की, मी त्यावेळी या लोकांवर कोणतीही कारवाही केली नाही. कारण, मला कामाची गरज होती. मी चित्रपट सृष्टीत काम करु इच्छिते. सागरिकाने असा ही आरोप केला की, उल्लू ॲप पोर्न कंटेन्ट तयार करुन पैसे कमवत आहेत. तसेच माझ्या सूत्रांकडून मला अशी माहिती मिळाली आहे की, विभू अग्रवाल याने अनेक मुलींचे लैगिंक शोषण केले आहे.
सागरिका म्हणाली की, आपण वकीलांमार्फत विभु अग्रवाल यांच्यावर केस दाखल करणार आहे. विभु अग्रवाल याला ही राज कुंद्रा प्रमाणे तुरुंगात डांबले पाहिजे. त्याचे पोर्न ॲप उल्लू बंद करण्याची गरज आहे. देशातून असली घाण स्वच्छ केली केली पाहिजे.
सागरिका शोना सुमन हिच्या गंभीर आरोपानंतर उल्लू ॲपच्या प्रवक्त्याने सांगतिले की, सागरिका ने ॲपच्या संदर्भात जे आरोप केले आहेत ते निराधार आहेत. आम्ही कलाकारांसोबत कधीही थेट संपर्क साधत नाही.