नेहा कक्कड लवकरच करणार लग्न; कोण आहे रोहनप्रीत? | पुढारी

नेहा कक्कड लवकरच करणार लग्न; कोण आहे रोहनप्रीत?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

इंडियन आयडॉल जज आणि बॉलिवूडची लोकप्रिय गायक नेहा कक्कड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नेहा आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग गेल्या काही दिवसांपासून  एकमेकांना डेट करत होते. परंतु याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नव्हती आता नेहाने सोशल मीडियावरून या माहितीला दुजोरा दिला आहे. 

नुकताच नेहाने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा आणि रोहनप्रीत एकत्रित बसलेले असून दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे. हा फोटोसोबत नेहाने कॅप्शन लिहिली आहे की, ‘तू माझा आहेस’. 

यानंतर लगेच रोहनप्रीतने कॉमेंन्ट करत लिहिले आहे की, ‘आय लव्ह यू नेहा. मी फक्त तुझाच आहे. माझे संपूर्ण जीवन तू आहेस’. तसेच यासोबत हार्ट असलेले इमोजी ही वापरले आहे.

सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. नेहा येत्या २४ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये लग्न करणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच नेहाचा रोका झाला असल्याचे देखील म्हटले जात आहे. 

कोण आहे रोहनप्रीत?

रोहनप्रीत सिंग हा एक गायक आहे. रोहनप्रीतने ‘रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे’ मध्ये सहभाग दर्शविला होता. या शोत त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी प्रपोज केलं होते. यानंतर काही  दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्रित काम केले.आणि यानंतर दोघांची ओळख वाढली.  

नेहाच्या एक्स बॉयफ्रेंडची कॉमेंन्ट 

नेहाच्या एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, रोहनप्रीत आणि नेहा यांच्यातील नात्याबद्दल मला काहीच माहिती नाही, परंतु मी त्याच्यासाठी आनंदी आहे. नेहा खरोखरच लग्न करत असेल तर मी तिच्या या निर्णयासाठी खूश आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 
अधिक वाचा 

कॉमेडी ते हॉररचा तडका, पुढील तीन महिन्यांत येणार ९ चित्रपट  

सुबोध म्हणतो- लतादिदींकडून कौतुक, आणखी काय हवं?

(video, photo : nehakakkar instagram वरून साभार)


 

Back to top button