‘विवाह’ फेम अमृता रावचे दिसले बेबी बंप! | पुढारी

'विवाह' फेम अमृता रावचे दिसले बेबी बंप!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने लग्नानंतर आपले वैयक्तिक जीवन चित्रपट आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून खूप दूर ठेवले आहे. तर सध्या अमृताच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगली आहे. अमृताने आर.जे. अनमोल यांच्याशी लग्न केले आहे. करीना कपूर, अनुष्का शर्मा आणि सागरिका घाटगे या प्रेग्नेंसीच्या यादीत अमृता रावचा समावेश झाला आहे. 

अमृता आणि आर. जे. अनमोल पहिल्यांदाच पालक होणार आहेत. सध्या अमृताचा खार येथील क्लिनिकच्या बाहेरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत अमृता बेबी बंपमध्ये दिसली आहे. अमृता आणि अनमोलचे तब्बल ७ वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न झाले होते. दोघांचे लग्न साध्या आणि गुपचूप पद्धतीने पार पडले होते. या विवाह सोहळ्यात कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते.

सूत्राच्या माहितीनुसार, ‘ती आपल्या आयुष्याचा हा टप्पा आनंदाने जगत आहे. अमृताच्या प्रेग्नेंसीबद्दल इतर कोणालाच माहिती नाही, परंतु तिच्या जवळच्या नातेवाईकांना यांची माहिती आहे. देशातील लॉकडाऊनच्या आधीच ती प्रेग्नेंट होती. याशिवाय अमृता आणि अनमोल यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी खाजगी केलेल्या नाहीत.’   

dinsta

अमृताने ‘अब के बरस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. हा चित्रपट २००२ मध्ये रिलीज झाला होता. अमृताच्या ‘इश्क-विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अमृता रावची जोडी त्याकाळी चित्रपटांमध्ये चांगलीच गाजली होती.

(photo : amrita rao fc instagram वरून साभार)

अधिक वाचा 

कंगना म्हणते, बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार

अनुष्‍कानंतर सागरिका घाटगेने दिली ‘गुडन्यूज’!

Back to top button