अनुप जलोटा, जसलीन माथूर पुन्हा ट्रेंडमध्ये का आले?  | पुढारी

अनुप जलोटा, जसलीन माथूर पुन्हा ट्रेंडमध्ये का आले? 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बिंग बॉसचा नवा १४ वा सिजन काही दिवसांपूर्वीच सुरु झाला आहे. या सिजनची हवा अजून तयार झाली नाही तोच १२ व्या सिजनमधील अनुप जलोटा पुन्हा एकदा ट्रेंडवर आले आहेत. अनुप जलोटा आणि त्यांची कथित गर्लफ्रेंड जसलीन माथूर यांचा एक फोटो सध्या खूप गाजत आहे. जसलीन जलोटाने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. यात अनुप जलोटा आणि जसलीन माथूर हे दोघे लग्नाच्या गेटमपमध्ये दिसत आहेत. 

वायची साठीपार केलेले अनुप जलोटा आणि तिशीत असलेली जसलीन माथूर हे दोघे बिग बॉसच्या १२ व्या हंगामात गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड म्हणून सामील झाले होते. पण, नंतर त्या दोघांनी हे एक प्रँक होते असा खुलासा केला होता. आता त्यांचे लग्नाच्या लूक मधील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक जण त्यांनी लग्न केले आहे का असे विचारत आहेत. 

पण, एका नेटकऱ्याने जसलीन माथूरचीच काही दिवसांपूर्वीच्या एक पोस्टचा हवाला देत हे सर्व एका चित्रपटसाठी असल्याचा दावा केला. जसलीनच्या या पोस्टमध्ये तिने तिचा आणि अनुप जलोटांचा फोटो शेअर करत त्याला ‘अखेर काम सुरु झाले आहे. अनुप जलोटांबरोबरच्या ‘वो मेरी स्टुडंट हैं’ या हिंदी चित्रपटाचे शुटिंग करत आहे’ असे कॅप्शन दिले होते. 

जसलीन ही ६७ वर्षांचे गायक अनुप जलोटा यांची शिष्या आहे. २०१८ च्या बिगबॉसमध्ये तिने त्यांची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शो च्या शेवटी त्यांनी हा एक फक्त जोक होता आमच्यात फक्त गुरु शिष्या असेच नाते आहे असा खुलासा केला होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जसलीन माथूर ही सध्या कॉस्मेटिक सर्जन अभिनित गुप्ता यांना डेट करत आहे. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जसलीनने अनुप जलोटांनीच अभिनित यांच्याशी ओळख करुन दिल्याचे सांगितले होते. 

Back to top button