म्यानमार ते मुंबई; हेलनचा हृदयद्रावक प्रवास! | पुढारी

म्यानमार ते मुंबई; हेलनचा हृदयद्रावक प्रवास!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

डान्सर, अभिनेत्री हेलन यांना जर बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज हेलन ८१ वर्षांच्या आहेत. हेलन यांना शेवटी २००० मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘मोहब्बते’मध्ये पाहण्यात आलं होतं. लाईमलाईटपासून त्या १७ वर्षे दूर आहेत. कधी-कधी आपल्या परिवारासोबत त्या कार्यक्रमात दिसतात. भारतीय सिनेमामध्ये आयटम सॉन्ग करण्याची सुरुवात हेलन यांनी केली होती. हेलन जोपर्यंत चित्रपटांमध्ये होत्या, तोपर्यंत त्यांचे स्टारडम कमी झालेले नव्हते. आपल्या डान्सने हेलनने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. तिच्यासारखा डान्स आजपर्यंत कुणीही करू शकलेले नाही. आज त्यांचा वाढदिवस. या औचित्याने त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया. 

हेलन यांनी मोठ्या पडद्यावर थिरकताना सिनेप्रेमींची मने जिंकली. चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या हेलन यांच्या आयुष्यात कधी काळी अंधार होता. हेलन यांचा जन्म २१ नोव्हेंबर, १९३८ रोजी बर्मा (म्यानमार) मध्ये झाला होता. त्यांची आई बर्माची होती. हेलन यांना एक भाऊ आणि एक सावत्र बहिण जेनिफर होती. वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने एका ब्रिटिश सैनिकाशी विवाह केला. त्यानंतर हेलनने आपल्या सावत्र वडिलांचे आडनाव रिचर्डसन स्वीकारलं. परंतु, दुसऱ्या महायुध्दात रिचर्डसन यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी जपानने बर्मावर ताबा मिळवला, त्यावेळी हेलनचे कुटुंब मुंबईला आले.

Happy Birthday Helen!. Helen, a great beauty and a fabulous… | by  Bollywoodirect | Medium

प्रवास करताना त्यांना जंगल आणि गावातून जावं लागलं. हेलन यांची आई आणि भाऊ-बहिण भुकेने व्याकूळ होते. तेव्हा गावातील लोकांनी आपल्या घरात राहायला जागा दिली आणि जेवणही दिले. तेथे एका ब्रिटिश सैनिकाने त्यांना मुंबईला जाण्यासाठी गाडी, जेवण आणि औषधे दिली. ज्या ग्रुपसोबत हेलन यांचे कुटुंब मुंबईला जात होते. त्याताल काही लोक भुकेने आणि काही जण आजारपणामुळे मृत्यूमुखी पडले. मुंबई दूर होती. त्यामुळे हेलन यांच्या आईने कोलकातामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. त्या तेथे नर्स म्हणून काम  करू लागल्या. 

द कपिल शर्मा शोमध्ये हेलेन यांनी आपल्या आयुष्यातील ही घटना सांगितली होती. हेलेन केवळ ३ ‍वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्यांनी आणि परिवाराने बर्मा सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. बर्मा सोडून भारतात येण्यासाठी त्यांना ९ महिन्यांचा कालावधी लागला होता. यादरम्यान, त्यांच्या भावाचादेखील मृत्यू झाला होता. 

Retro Bollywood

हेलन आणि तिच्या दोन भावंडांना शाळेला पाठवण्यात आले. परंतु, आईच्या पगारातून घर खर्च परवडत नव्हते. कोलकातामध्ये हेलन यांच्या आईची भेट कुकु मोरे हिच्याशी झाली. ती चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर होती. हेलन घर चालवण्यासाठी नोकरी शोधत होत्या. त्यावेळी कुकुने हेलन यांना चित्रपटांमध्ये कोरस डान्सरची नोकरी दिली. हेलन चित्रपटांमध्ये येताच कुकुचे चार्म कमी पडू लागले आणि हेलनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवले. 

१९ वर्षांची असताना हेलन यांना ‘हावडा ब्रिज’मध्ये मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटामध्ये गाने ‘मेरा नाम चिन चिन चू’ने हेलन यांचे नशीब बदललं. यानंतर त्या बॉलिवूडच्या पहिल्या आयटम गर्ल बनून समोर आल्या.  हेलनने आपल्या सौंदर्याने आणि डान्सने सर्वांची मने जिंकली. 

Happy birthday Helen, still the best dancer in Bollywood

१९५७ मध्ये हेलन यांनी आपल्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे डायरेक्टर पीएन अरोराशी लग्न केले.  हेलन चित्रपटांत काम करून चांगली कमाई करायच्या आणि तिचा पती पैसे खर्च करायचा. म्हणून हेलन यांनी पीएन अरोराशी घटस्फोट घेतला.

Helen | Vintage bollywood, Helen bollywood, Helen actress

सलीम खानशी अशी झाली भेट 

Helen on marrying Salim Khan: The fact that Salim was a married man did  disturb me

१९६२ मध्ये ‘काबिल खान’ चित्रपटादरम्यान हेलन यांची  भेट सलमान खानचे वडील सलीम खानशी झाली. सलीम खान यांनी हेलन यांना चित्रपटांमध्ये काम देण्यासाठी मदत केली. सलीम विवाहित होते. तरीही १९८० मध्ये त्यांनी हेलन यांच्याशी लग्न केले. सलीम आणि सलमा खान (पहिली पत्नी) यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ४ मुले होती.   

Salim Khan's family was against him for marrying Helen - OrissaPOST

हेलन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी सलीम खान यांचा खूप आदर करते. आणि त्यांनी माझा कोणताही फायदा न घेता माझी सिनेइडस्ट्रीत मदत केला होती. परंतु, सलमा खान यांना मी सलीम खान यांच्याशी लग्न केलेले सहन झाले नव्हते. सुरुवातीला मुलांकडूनही विरोध झाला होता. परंतु, सलीम यांनी समजावलं आणि सांगितलं की, हेलन घर तोडणारी महिला नाही. सलीम खानच्या मुलांनीही हेलन यांना आईचा दर्जा दिला. सलमा खानशीही त्यांची चांगली मैत्री आहे. 

Salman Khan's family picture with father Salim, Arpita and others will give  you Hum Saath Saath Hain feel | Celebrities News – India TV

हेलन यांनी १९८३ मध्ये चित्रपटांपासून संन्यास घेतला. परंतु, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गेस्ट अपीयरेन्स दिला. हेलन यांना भारतीय सिनेमामध्ये अमूल्य योगदानासाठी पद्मश्री आणि फिल्मफेअर लाईफटाईम अचीव्हमेंट ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 

Back to top button