श्रुती मराठेच्या ग्लॅमरस लुकने चाहते क्लीन बोल्ड! | पुढारी

श्रुती मराठेच्या ग्लॅमरस लुकने चाहते क्लीन बोल्ड!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या अनोख्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रुती मराठी हिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलच धुमाकूळ घातला आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे.

वाचा: कंगना हाजिर हो!; मुंबई पोलिसांकडून समन्स

लाँग स्लीट असणाऱ्या एका टू पीस ड्रेसमध्ये श्रुती सौंदर्य आणखी खुलून आले आहे. हे फोटो शेअर करताना श्रुतीने लिहिले, ”अलग हूँ गलत नहीं’. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

या टू पीस फोटोशुटपूर्वी आणखी एक फोटोशुट तिने शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा वनपीस घातला आहे आणि त्यावर जॅकेट घातला आहे. हे फोटो शेअर करताना श्रुतीने ”मैं हूं ही नहीं इस दुनिया की” अशी कॅप्शन दिली आहे. 

वाचा: म्यानमार ते मुंबई; हेलनचा हृदयद्रावक प्रवास!

तिचे हे बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. तिच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांची दाद दिली आहे. श्रुती नेहमी आपल्या स्टायल आणि फॅशनमध्ये बदल करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Back to top button